Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर
किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
मिळालेल्या माहितीनुसार, गूगलच्या या नवीन स्टोरेज नियमांतर्गत आता अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये मिळणारे बॅकअप देखील यूजर्सच्या फ्री 15GB स्टोरेजमध्ये मोजले जाणार आहे. आतापर्यंत यूजर्सना जे फ्री स्टोरेज स्पेस ऑफर केले जात होते, त्यामध्ये गूगल फोटोजवर अपलोड करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ, यासोबतच एमएमएसद्वारे पाठवला जाणारा मीडिया डेटा समाविष्ट केला जात होता. मात्र आता या नव्या नियमांनंतर अँड्रॉईड डिव्हाईसचे संपूर्ण बॅकअप याच स्टोरेज लिमिटमध्ये जोडले जाणार आहे. या नव्या नियमांमुळे आता यूजर्सना 15GB फ्री स्टोरेजव्यतिरिक्त वेगळे स्टोरेज देखील खरेदी करावे लागणार आहे. यासाठी गूगलला प्रत्येक महिन्याला सब्सक्रिप्शन चार्ज द्यावा लागणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
गूगलच्या या नवीन नियमानंतर आता यूजर्सना बॅकअपवर पूर्वीपेक्षा जास्त कंट्रोल मिळणार आहे. आता यूजर्स ठरवू शकणार आहेत की, बॅकअपमध्ये कोणती माहिती समाविष्ट असणार आहे आणि कोणती नाही. या नव्या सेटिंगमध्ये एसएमएस, एमएमएस, कॉल हिस्ट्री आणि डिव्हाइस सेटिंग्जसाठी स्वतंत्र ऑन/ऑफ टॉगल्स देखील दिले जातील. खरं तर यापूर्वी डेटा बॅकअप डिव्हाईसच्या स्टोरेजमध्ये समाविष्ट होते. मात्र गूगलने देखील आता ॲपलप्रमाणेच डिव्हाईसचे बॅकअप क्लाऊडमध्ये ठेवण्याची पॉलिसी तयार केली आहे.
अँड्रॉईड बॅकअपमध्ये आता एसएमएस, डिव्हाईस सेटिंग्ज, कॉल हिस्ट्री आणि ॲप डेटासह महत्त्वाचे बॅकअप फाईल्स देखील समाविष्ट असणार आहे. यानंतर जर तुम्ही वेळोवेळी अँड्रॉईडचा बॅकअप घेतला तर तुमचे फ्री 15जीबी स्टोरेज वेगाने भरले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, गूगलने 7 जुलै 2026 पासून त्यांची नवीन पॉलिसी लागू केली आहे.
या नव्या नियमानंतर यूजर्सचं असं म्हणणं आहे की, आता लोकांचे फ्री 15जीबी स्टोरेज पूर्वीपेक्षा अधिक वेगाने भरणार आहे. मात्र गूगलचं असं म्हणणं आहे की, असं होणार नाही. गुगलने म्हटले आहे की, अँड्रॉइड बॅकअपसाठी पूर्वीपेक्षा केवळ 40 एमबी अधिक जागा लागेल. तसेच, नवीन नियमांनुसार यूजर्स कशाचा बॅकअप घ्यायचा हे स्वतः ठरवू शकतील, असेही गुगलने नमूद केले आहे.






