Google मॅसेजमध्ये आलं कमाल फीचर, आता ब्लर होणार अश्लील ईमेज! जाणून घ्या कसं करेल काम
गुगल त्यांच्या करोडो युजर्ससाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत आहे. या नवीन फीचर्सचा उद्देश युजर्सचा अनुभव सुधारणं आणि युजर्सची सुरक्षितता वाढवणं असा आहे. कंपनीने त्यांच्या मेल, क्रोम, युट्यूब आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मसाठी विविध फीचर्स रिलीज केले आहेत. आता देखील कंपनीने त्यांच्या गुगल मॅसेज या प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन फीचर रिलीज केलं आहे. हे फीचर युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन रिलीज करण्यात आलं आहे.
इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही… ‘हे’ आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes
हे नवीन फीचर अश्लिल ईमेज ऑटोमॅटिक ब्लर करते. गेल्या वर्षीच्या अखेरीस पहिल्यांदा या फीचरबाबत घोषणा करण्यात आली होती. हे वैशिष्ट्य संवेदनशील सामग्री शोधण्यासाठी आणि युजर्सनी असा मीडिया पाहण्यापूर्वी, पाठवण्यापूर्वी किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी चेतावणी देण्यासाठी ऑन-डिव्हाइस AI वापरते. सेन्सिटिव्ह मटेरियल अलर्ट सिस्टम ही सुरक्षित डिजिटल कम्युनिकेशनला प्रोत्साहन देण्यासाठी गुगलच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Android सिस्टमच्या SafetyCore सपोर्टेड टेक्नोलॉजीला याप्रमाणे डिझाईन करण्यात आलं आहे की, सर्व कंटेंट एनालिसिस डिव्हाइसवरच होते, म्हणजेच कोणताही फोटो डेटा किंवा ओळख माहिती Google सर्व्हरवर पाठवली जाणार नाही. हे केवळ यूजर्सची गोपनीयता सुनिश्चित करणार नाही तर धोकादायक संवादांपासून त्यांचे संरक्षण देखील करेल. गुगलचे म्हणणे आहे की 18 वर्षांखालील युजर्ससाठी हे अलर्ट बाय डीफॉल्ट चालू असतात, परंतु गुगल मेसेजेस सेटिंग्जद्वारे ते मॅन्युअली बंद केले जाऊ शकतात. प्रौढांसाठी, हे वैशिष्ट्य ऑप्ट-इन आहे आणि मॅन्युअली चालू केलं तर या फीचरचा फायदा घेता येणार आहे.
गुगलची ही नवीन सुरक्षा प्रणाली कोणताही अश्लील फोटो पाठवण्यापूर्वी किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी सक्रिय होते. अशा परिस्थितीत, जर असा कोणताही कंटेंट आढळला, तर युजर्सना एक संदेश दिसेल ज्यामध्ये युजर्सना ‘हो, पाठवा’ किंवा ‘नाही, पाठवू नका’ असा पर्याय मिळेल आणि का असे विचारले जाईल. या पॉप-अप मेसेजमुळे, युजर्सना अश्लील कंटेट पाठवण्यापूर्वी विचार करावा लागेल.
गुगलने जारी केलेले हे नवीन फीचर सध्या फक्त फोटो-आधारित सामग्रीपुरते मर्यादित आहे आणि व्हिडिओंना लागू होत नाही. त्यामुळे गूगल मॅसेजद्वारे जेव्हा एखादा फोटो शेअर केला जाईल, तेव्हाच या फीचरचा वापर करता येणार आहे. हे फीचर ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याच्या सुरु असलेल्या चाचण्यांमुळे आता अखेर ते रिलीज करण्यात आलं आहे. हे फीचर नियंत्रित करण्यासाठी सेटिंग – मॅसेज> Safety and Security> मॅनेज सेंसिटिव कंटेंट वॉर्निंग्स अशी सेटिंग आहे. गुगलने जारी केलेल्या या नवीन फीचरमुळे आता युजर्सच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. शिवाय अश्लील ईमेज पाठवणाऱ्यांना देखील आळा बसणार आहे.