लवकरच बदलणार UPI पेमेंटची पद्धत! पैसे ट्रान्सफर करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, तुमच्या आवाजाने होईल सर्व काम
हल्ली सर्वच लोक ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात तरी तिथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली जाते. खरं तर भारताला डिजिटल इंडिया बनण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचा देखील मोठा वाटा आहे. भारतातील सुमारे 80 टक्के लोक ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. यातील बहुतेक लोक गूगल पेचा वापर करतात. त्यामुळे गुगल पे त्यांच्या यूजर्ससाठी नेहमीच नवीन अपडेट घेऊन येतो, ज्यामुळे युजर्सना पेमेंट करणे अधिक सोपे व्हावे. आता देखील कंपनी लवकरच एक नवीन अपडेट घेऊन येणार आहे.
Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत
आतापर्यंत जर तुम्हाला गूगल पेच्या मदतीने पेमेंट करायचं असेल तर समोरच्याला जितकी रक्कम द्यायची आहे, ती तुम्हाला टाईप करावी लागत होती. पण आता अस होणार नाही. कंपनी लवकरच आपल्या यूजरसाठी एक नवीन AI फीचर लाँच करणार आहे, ज्याद्वारे युजर्स फक्त बोलून यूपीआय पेमेंट करू शकतील. या नवीन फीचरमुळे डिजिटल पेमेंट करणं आणखी सोपे होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल पे इंडियाचे लीड प्रोडक्ट मॅनेजर शरथ बुलुसु यांचा असा विश्वास आहे की, गूगल पे मध्ये येणार व्हॉइस फीचर ऑनलाइन पेमेंटचा मार्ग बदलू शकते. जरी, या वैशिष्ट्याबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु जे लोक दररोजच्या व्यवहारांसाठी UPI वापरतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. कारण त्यांना आता पेमेंट करण्यासाठी टायपिंगची गरज भासणार नाही.
गुगल पेमध्ये व्हॉइस कमांड जोडल्यामुळे, अशिक्षित किंवा ज्या लोकांना तंत्रज्ञानाबद्दल फारशी माहीती नाही अशा लोकांनाही ऑनलाइन पेमेंट करणे सोपे होईल. अहवालांनुसार, युजर्स फक्त बोलून व्यवहार पूर्ण करू शकतील, त्यामुळे त्यांना स्क्रीनवर टाइप करण्याची किंवा पर्याय शोधण्याची आवश्यकता राहणार नाही. भारतीय भाषांमध्ये डिजिटल पेमेंट सुलभ करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या “भाषिनी एआय प्रोजेक्ट” सोबत गुगल काम करत असल्याने हे वैशिष्ट्य लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. गूगल पेच हे फीचर युजर्ससाठी बरंच फायद्याचं ठरणार आहे.
iPhone पासून Vivo V50 पर्यंत, पुढील आठवड्यात लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स! वाचा संपूर्ण यादी
भारतातील वाढत्या ऑनलाइन फसवणुकीला तोंड देण्यासाठी गुगल आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भारताच्या प्रचंड डिजिटल बाजारपेठेमुळे, गुगल या क्षेत्रात सतत नवनवीन शोध घेत आहे.
भारतातील UPI पेमेंट क्षेत्रातील सर्वात मोठे खेळाडू फोनपे आणि गुगल पे आहेत. नोव्हेंबर 2024 च्या अहवालानुसार, एकूण UPI व्यवहारांमध्ये Google Pay चा वाटा 37 टक्के आहे, तर PhonePe 47.8 टक्के सह पहिल्या क्रमांकावर आहे. एकत्रितपणे, हे दोन्ही प्लॅटफॉर्म UPI बाजारपेठेचा 80% पेक्षा जास्त हिस्सा व्यापतात. गुगल पेमध्ये व्हॉइस फीचर आल्याने, त्याच्या युजर्सची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे डिजिटल पेमेंटची व्याप्ती आणखी वाढू शकते.