AI Impact Expo 2026: विकसित भारता'चे स्वप्न होणार साकार! AI मुळे वाढणार जगाचा जीडीपी... क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांचा दावा
एआयचा वापर अधिक परिणाम निर्माण करतो. आमच्या अभ्यासानुसार एआय जागतिक आर्थिक विकासदर सुमारे एक टक्क्याने वाढवू शकते. आम्हाला ही वाढ सुमारे ०.८ टक्के असण्याचा अंदाज आहे. आयएमएफने केलेल्या अभ्यासानुसार एआयच्या वापरातून जगभरात आर्थिक विकासदरात लक्षणीय वाढ होण्याची क्षमता आहे. जागतिक स्तरावर आर्थिक विकासाची गती ही कोविड महामारीपूर्वीपेक्षाही अधिक वाढू शकते. (फोटो सौजन्य – X)
An excellent #AISummit conversation with Mariano-Florentino Cuellar, @ITUSecGen Doreen Bogdan-Martin, @johahill & @Joteo_ylm on AI’s global economic impact. Done right, AI can boost productivity & growth — but only with the right policies to unlock benefits while managing risks. pic.twitter.com/iXyH7BUxkr — Kristalina Georgieva (@KGeorgieva) February 20, 2026
आर्थिक विकासावर एआयचे सकारात्मक परिणाम असूनही नोकरी बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही हा धोका मोजला आहे आणि तो खूप जास्त आहे. नोकऱ्यांवर एआयचा परिणाम त्सुनामीसारखा असू शकतो, जगातील सुमारे ४० टक्के नोकऱ्या एआयमुळे प्रभावित होऊ शकतात. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, हा आकडा ४० टक्के असू शकतो, तर विकसित देशांमध्ये, हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा इशारा नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला.
नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एआय समिटमध्ये क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दुधारी तलवार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, AI मुळे जागतिक जीडीपी वाढ (विकास दर) वर्षभरात 0.8 टक्के अंकांनी वाढू शकतो, ज्यामुळे कोविडपूर्वीपेक्षा वेगवान आर्थिक वाढ शक्य होऊ शकते. ही एक सर्वात चांगली संधी असल्याचे म्हणत जॉर्जिएवा यांनी सांगितलं की, जलद वाढीमुळे नवीन नोकऱ्या आणि संधी निर्माण होतील. ज्यामुळे प्रगतीचा वेग देखील वाढणार आहे.
यासोबतच जॉर्जिएवा यांनी एक इशारा देखील दिला आहे. आयएमएफच्या संशोधनानुसार, AI मुळे जागतिक स्थरावर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. एंट्री-लेवल नोकऱ्या सर्वाधिक धोक्यात आहेत. याचा परिणाम विशेषत: तरूणांवर होऊ शकतो. काही नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात, काहींचा मार्ग बदलू शकतो तर काही नोकऱ्यांसाठी अधिक कुशल लोकांची आवश्यकता असू शकते. धोरणे योग्यरित्या अंमलात आणली गेली नाहीत तर असमानता वाढण्याचा धोका आहे.






