Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका... जाणून घ्या सविस्तर
गुरुवारी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, कार्ल पेई यांच्या नेतृत्वाखालील स्मार्टफोन निर्माता कंपनीने घोषणा केली आहे, नथिंग ओएस 0.5 हे 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता BST (दुपारी 3:30 वाजता IST) सादर केले जाणार आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या टिझरमध्ये आगामी अपडेट्सबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही, मात्र या टिझरमध्ये डिझाईन बदलाबाबत काही संकेत नक्कीच मिळत आहेत. यामध्ये नवीन आयकॉन आणि विजेट समाविष्ट आहे. नथिंग ओएस 5.0 लेटेस्ट अँड्रॉईड 17 अपडेटवर आधारित असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, ओएस अपग्रेडचा भाग म्हणून यामध्ये नवीन फीचर्स मिळू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
More joy, every day.
Nothing OS 5.0 25.08.
11:00 BST pic.twitter.com/OThGjRCSH6 — Nothing (@nothing) August 20, 2026
कंपनी 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या नथिंग ओएस 5.0 बीटा प्रोग्रामची घोषणा करण्याची शक्यता आहे. याचे पहिले पब्लिक बीटा वर्जन यावर्षीच्या अखेरपर्यंत रोलआऊट केले जाऊ शकते. स्टेबल वर्जन कधीपर्यंत रिलीज केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या नथिंग 4 ए सीरीज आणि फ्लॅगशिप फोन 3 साठी हे अपडेट सर्वात आधी रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.
गूगलने जून महिन्यात पिक्सेल 6 आणि त्यानंतरच्या स्मार्टफोनसोबत पिक्सेल टॅब्लेटसाठी अँड्रॉईड 17 अपडेटचे पहिले स्टेबल वर्जन रोल आउट करण्यास सुरुवात केली. केवळ ज्या पिक्सेल फोन्सना अँड्रॉईड 17 अपडेट मिळाले आहे, तेच याशी सुसंगत आहेत. आधीच सांगितल्याप्रमाणे, मोटोरोलाने त्यांच्या अँड्रॉईड 17 बीटा प्रोग्रामची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्याचप्रमाणे, विवोने अँड्रॉईड 17 वर आधारित ‘ओरिजिनओएस 7’ बीटा प्रोग्रामची घोषणा केली आहे आणि ओप्पोने अँड्रॉइड 17 वर आधारित ‘कलरओएस 17’ बीटा प्रोग्राम सादर केला आहे.
राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, अँड्रॉईड 17 मध्ये नवीन मल्टीटास्किंग फीचर ‘बबल्स’ जोडले आहेत, ज्याच्या मदतीने, एखाद्या ॲपच्या आयकॉनवर दीर्घकाळ दाबून (लाँग-प्रेस करून) ते ॲप ‘फ्लोटिंग विंडो’मध्ये रूपांतरित करता येते. याव्यतिरिक्त, ‘स्क्रीन रिअॅक्शन्स’ हे एक नवीन वैशिष्ट्य सादर करण्यात आले आहे, जे स्क्रीन रेकॉर्डिंगसोबतच फ्रंट कॅमेऱ्याद्वारे यूजरची प्रतिक्रिया देखील रेकॉर्ड करते. स्क्रीन रेकॉर्डिंगवर एका लहान चौकटीत कॅमेराचा व्हिडिओ दिसतो. ‘नथिंग ओएस 5.0’ मध्येही या वैशिष्ट्यांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे.






