YouTube वर व्हिडीओ बघून कंटाळा आलाय? नवीन फीचरच्या मदतीने आता घ्या गेमचा आनंद, वेगळं App डाऊनलोड करण्याचीही गरज नाही
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. युजर्सची वाढती संख्या लक्षात घेऊन कंपनी नेहमीच नवीन फीचर्स ऑफर करत असते. यामुळे YouTube वरील फीचर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. हे फीचर युजर्ससाठी अत्यंत मजेदार असणार आहे. कारण या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही YouTube वर गेम देखील खेळू शकणार आहात.
YouTube वर अनेक प्रकारचे व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. यामध्ये शैक्षणिक, धार्मिक, बॉलीवूड, गाणी, संगीत, असे असंख्य प्रकारचे व्हिडीओ तुम्ही YouTube वर पाहू शकता. युजर्स प्लेबॅक स्पीड वाढवून व्हिडिओ पाहू शकतात किंवा स्लो मोशनमध्ये देखील व्हिडीओ पाहू शकतात. याशिवाय, तुम्ही डेटा सेव्हिंग मोडमध्ये व्हिडिओ पाहून डेटा वाचवू शकता. पण सतत व्हिडीओ पाहून कंटाळा आला तर काय करणार? अशावेळी तुम्ही YouTube च्या नवीन फीचरचा वापर करू शकता. आता युट्यूबमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे ज्याद्वारे तुम्ही YouTube वरच गेम खेळू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ पाहून कंटाळा येत असेल तर आता तुम्ही अॅपवर गेम देखील खेळू शकता. यामुळे, आता तुम्हाला वेगळा गेमिंग अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि यामुळे स्मार्टफोनचे स्टोरेज देखील वाचेल. या फीचरचे नाव YouTube Playables आहे. या नवीन फीचरच्या मदतीने आता तुम्ही YouTube वरच गेम खेळू शकणार आहात.
YouTube Playables हे एक परस्परसंवादी गेमिंग वैशिष्ट्य आहे जे युजर्सना कोणतंही नवीन गेमिंग अॅप इंस्टॉल करण्याची गरज नाही. कारण YouTube चं नवीन गेमिंग फीचर तुम्हाला YouTube अॅपवर किंवा वेबवर गेम खेळण्याची परवानगी देते. पण यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ही अट म्हणजे या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला YouTube ची सदस्यता खरेदी करावी लागणार आहे.
रामकृष्ण मिशन आश्रममधील स्वामी बनले Digital Arrest चे शिकार, स्कॅमर्सनी लावला इतक्या कोटींचा चुना
नवीन फीचर अंतर्गत ऑफर केले जाणारे गेम हे कॅज्युअल गेम आहेत, जे मानसिक क्रियाकलाप वाढवतात आणि कंटाळा दूर करतात. हे गेम लगेच सुरू होतात म्हणजे लोडिंग वेळेची किंवा अपडेट्सची कोणतीही समस्या येत नाही. गेम्सचा आकार जास्त नसल्यामुळे ते जास्त डेटा वापरत नाहीत. विशेष म्हणजे हे गेम खेळताना जाहिराती दाखवल्या जात नाहीत.
विद्यार्थी अभ्यासादरम्यान 5-10 मिनिटे गेम खेळून त्यांचे मन ताजेतवाने करू शकतात किंवा काम करणाऱ्या व्यावसायिकांना कामाच्या दरम्यान 5-10 मिनिटे गेम खेळून त्यांचे मन ताजेतवाने करता येते. काही गेम तुमची प्रगती वाचवतात जेणेकरून तुम्ही जिथे सोडले होते तेथून पुन्हा सुरू करू शकता. तथापि, YouTube चे हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुम्हाला YouTube Premium चे सदस्यत्व घ्यावे लागेल.