जमिनीवर फेका नाहीतर टेबलवर आपटा! 'हा' मेड-इन-इंडिया टॅब्लेट अजिबात तूटणार नाही, केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला Video
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे मेड-इन-इंडिया टॅब्लेटचा. या टॅब्लेटची खासियत म्हणजे हा भारतात डिझाईन केला आहे, शिवाय हा टॅब्लेट अत्यंत टिकाऊ देखील आहे. म्हणजेच तुम्ही हा टॅब्लेट जमिनीवर फेकला किंला टेबलवर आपटला, तरी देखील त्याला काहीच होणार नाही. अहो, इतकंच नाही तर तुम्ही या टॅब्लेटवर उभं देखील राहू शकाता. तरीही त्याला काही होणार नाही.
अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केलेला व्हिडीओ हा व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अश्विनी वैष्णव यांनी लिहीलं आहे की, ‘नाही तूटणार. डिझाईन इन इंडिया, मेड इन इंडिया.’ एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये केंद्रीय मंत्री मेड इन इंडिया टॅब्लेटच्या टिकाऊपणाची चाचणी घेताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – X)
नहीं टूटेगा!
Designed in India, Made in India. pic.twitter.com/Ez6BpVasvJ
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 18, 2025
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, केंद्रीय मंत्री मेड इन इंडिया टॅब्लेट जमिनीवर फेकताना, उंचीवरून खाली टाकताना दिसत आहेत. एवढंच नाही टॅब्लेटवर उभं राहून केंद्रीय मंत्र्यांनी त्याचा टिकाऊपणा तपासला. या सर्व चाचण्यांमुळे भारतात तयार करण्यात आलेला हा टॅब्लेट किती टिकाऊ आहे, हे सिद्ध झालं, ही पोस्ट ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत स्वदेशी आणि उच्च-गुणवत्तेच्या इलेक्ट्रॉनिक्ससाठी भारताच्या वाढत्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.
केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ देखील व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील आहे. या व्हिडिओमध्ये, केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या AI सर्व्हर तंत्रज्ञानाची झलक ‘भारताचा एआय सर्व्हर… ‘व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीज येथे अॅडिपोली’ या कॅप्शनसह शेअर केली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि उत्पादन प्रक्रियेबद्दल माहिती मिळवली. हा उपक्रम केंद्रीय मंत्र्यांच्या फेब्रुवारीमधील मागील पोस्टची आठवण करून देतो, ज्यामध्ये त्यांनी VVDN टेक्नॉलॉजीजचे “डिझाइन केलेले आणि भारतात बनवलेले” लॅपटॉप सादर केले होते.
India’s AI server… ‘Adipoli’ 👍
at VVDN Technologies pic.twitter.com/dJcRDxNYhx
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 18, 2025
हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. शिवाय तंत्रज्ञान क्षेत्रात भारत अधिक मजबूत कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशांतर्गत उत्पादनात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य देऊन उत्पादन-लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजनेने या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये, सरकारने माहिती दिली होती की आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय 2.0 योजनेने आधीच 10,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अवघ्या 18 महिन्यांत 3,900 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. हे सर्व भारताचे ऐतिहासिक यश असल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या 10 महिन्यांत स्मार्टफोन भारतातील सर्वात मोठी निर्यात श्रेणी म्हणून उदयास आले आहेत, जी सरकारच्या पीएलआय योजनेअंतर्गत एक मोठी यशोगाथा आहे.