Oneplus 13 चे डिझाइन आलं समोर, अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह लवकरच करणार एंट्री
वनप्लस लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन Oneplus 13 लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन स्मार्टफोनचं डिझाईन नुकतंच समोर आलं आहे. हा स्मार्टफोन अपग्रेड केलेल्या फीचर्ससह लवकरच लाँच केला जाणार आहे. OnePlus 13 ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस चीनी बाजारात लाँच होणार आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत हा फोन अनेक अपग्रेड फीचर्ससह आणला जात आहे. यामध्ये डिझाईनपासून ते कॅमेरापर्यंत अनेक बदल होऊ शकतात. चीनमध्ये लाँच केल्यानंतर भारतासह जागतिक स्तरावर या फोनची एंट्री होईल. लाँचपूर्वी या नवीन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
हेदेखील वाचा- 6000 mAh बॅटरीसह लाँच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी
वनप्लस देशांतर्गत बाजारपेठेसाठी नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. आगामी फ्लॅगशिप फोन ऑक्टोबरच्या अखेरीस चिनी बाजारात लाँच केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यानंतर हा स्मार्टफोन काही वेळाने भारतात देखील दाखल होईल. लाँच होण्यापूर्वी, फोनबद्दल अनेक डिटेल्स ऑनलाइन समोर आले आहेत. Weibo पोस्टमध्ये फोनचे डिझाईन देखील दिसले आहे. रिपोर्टनुसार, OnePlus 13 फ्लॅटर बॅक डिझाइन आणि साइड एजसह प्रवेश करेल, जो मागील फोनपेक्षा थोडा वेगळा आहे. (फोटो सौजन्य – X)
OnePlus 13 मध्ये टेक्सचर्ड फिनिशसह मॅट फिनिश देखील असेल. ज्याची फिनिश मागील Oneplus 12 पेक्षा चांगली असेल. डिझाईनच्या बाबतीत फारसा बदल अपेक्षित नाही, पण त्यात अनेक प्रमुख गोष्टी बदलतील. Oneplus चा हा फोन लाँच होण्यापूर्वी अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे. जिथे त्याच्याबद्दल काही स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहेत.
फोनमधील कामगिरीसाठी, क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 4 वापरला जाऊ शकतो, ज्याला स्नॅपड्रॅगन 8 एलिट देखील म्हटले जात आहे. ही चिप 21 ऑक्टोबर रोजी सादर करण्यात येत आहे. वनप्लसचा फ्लॅगशिप फोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल आणि काही दिवसांनी तो भारतासह जगभरात लाँच होईल.
हेदेखील वाचा- ‘या’ दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट दिवाळी सेल! प्रत्येक खरेदीवर मिळणार भरगोस डिस्काऊंट
OnePlus 13 मध्ये 5G, 4G LTE, W-Fi, ब्लूटूथ आणि नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) कनेक्टिव्हिटी दिली जाऊ
शकते. यात OIS आणि EIS सपोर्टसह 50MP प्राथमिक कॅमेरा असेल. अहवालानुसार, OnePlus 13 स्मार्टफोन 4,096×3,072 पिक्सेल रिझोल्यूशनसह फोटो कॅप्चर करण्यासाठी सक्षम असेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP कॅमेरा असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने मागील सीरिजच्या तुलनेत डिझाइनमध्ये काही बदल केले आहेत. मात्र, फोन मागील सीरिजपेक्षा फारसा वेगळा दिसत नाही.
इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 13 मध्ये 6.8 इंच मायक्रो-वक्र 2K LTPO डिस्प्ले आहे, जो BOE X2 पॅनेलसह येतो. एचडीआर कंटेंट प्ले करताना त्याची कमाल ब्राइटनेस 1600 निट्स आणि 6000 निट्स पर्यंत आहे. फोनमध्ये 50W मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंगसह 100W SuperVOOC जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,000mAh हाय-डेंसिटी सिलिकॉन एनोड बॅटरी आहे.
फोनमध्ये OnePlus 11 आणि OnePlus 12 सारखेच गोलाकार कॅमेरा मॉड्यूल मिळेल. मात्र, यावेळी कंपनीने केवळ गोलाकार मोड्यूल दिले असून, त्याच्या कडा काढण्यात आल्या आहेत. याशिवाय, तुम्हाला एक पातळ आणि सिंगल स्ट्रिप दिली जाईल.