फोटो सौजन्य - Star Sports सोशल मिडिया
Sri lank vs England highlights : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा सुपर 8 चा दुसरा सामना आज श्रीलंका विरुद्ध इंग्लंड या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. हा सामना इंग्लंडच्या संघाने एकतर्फी जिंकला. पहिले फलंदाजी केल्यानंतर 147 धावांचे लक्ष जेव्हा उभे केले होते यावेळी इंग्लंडच्या हातून हा सामना पूर्णपणे निसटला असे दिसून येत होते. पण श्रीलंकेने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली. इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्या घरच्याच मैदानावर 51 धावांनी पराभूत करून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान आता या सामन्यानंतर पटकावले आहे.
यामध्ये इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करून नऊ विकेट्स गमावून 146 धावा 20 ओव्हरमध्ये केल्या. पहिले फलंदाजी करताना इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे फेल झाले, फिल्म सॉल्ट याने संघासाठी अर्धशतक ठोकले आणि त्याच्या जोरावर इंग्लंडचे संघाने 146 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर त्यांची सुरुवात तर फारच खराब झाली. श्रीलंकेच्या संघाने पावर प्लेमध्ये सहा ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावले होते. यामध्ये विल जॅक्स इंग्लंड साठी ट्रंपकार्ड ठरला. त्याने चार ओव्हर मध्ये तीन विकेट्स घेतले. तर जोफ्रा आर्चर याने देखील दमदार गोलंदाजी केली.
A brilliant bowling effort sees England seal a commanding victory over Sri Lanka in the #T20WorldCup Super 8 👊 📝: https://t.co/z6S9D2Pio1 pic.twitter.com/doTPDuqbY8 — ICC (@ICC) February 22, 2026
श्रीलंकेचा पहिल्या सहा फलंदाजांनी 20 आकडा देखील पार केला नाही. अजून निसान कायाने या विश्वचषकामध्ये शतक ठोकले होते पण तो इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये स्वस्तात बाद झाला. आजच्या सामन्यामध्ये इंग्लंडची गोलंदाजी प्रभावशाली राहिली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेची शेवटची आशा असलेला कर्णधार दासुन शनाकाही बाद झाला आहे. आदिल रशीदने शनाकाला ३० धावांवर बाद केले. या सामन्यामध्ये श्रीलंकेने फारच खराब कामगिरी केली.
इंग्लंडचा पुढील सामना हा पाकिस्तान विरूद्ध खेळवला जाणार आहे, तर श्रीलंकेच्या दुसरा सुपर 8 चा सामना हा न्यूझीलंडविरूद्ध असणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच तयारीत असतील. श्रीलंकेने लीग सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती पण ते इंग्लडसमोर पुर्णपणे फेल झाले. फलंदाजांनी फार काही चांगली कामगिरी केली नाही.






