Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus घेऊन येतोय ‘Ultra’ मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या

वनप्लस लवकरच त्यांच्या Ace 6 सिरीजमध्ये Ultra मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने याचा टीझर जारी केला असून, या स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्स मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे यूजर्सची उत्सुकता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 10:40 AM
OnePlus घेऊन येतोय 'Ultra' मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या

OnePlus घेऊन येतोय 'Ultra' मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • OnePlus लवकरच Ace 6 Ultra स्मार्टफोन लाँच करू शकते; कंपनीने अधिकृत टीझर देखील जारी केला आहे.
  • या फोनमध्ये MediaTek Dimensity 9500 प्रोसेसर, 165Hz डिस्प्ले आणि 8000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता.
  • रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच होऊ शकतो.
टेक कंपनी वनप्लसने आतापर्यंत OnePlus Ace 6 सिरीजअंतर्गत OnePlus Ace 6 आणि OnePlus Ace 6T हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. आता कंपनी या लाईनअपमध्ये आणखी एका नव्या स्मार्टफोनचा समावेश करत आहे. सॅमसंग आणि शाओमीनंतर आता टेक कंपनी वनप्लस देखील एक नवीन अल्ट्रा मॉडेल लाँच करण्याचा विचार करत आहे. हा नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 6 Ultra नावाने लाँच केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनचा टिझर देखील जारी केला आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा अनोखा खेळ! पुन्हा घेऊन आली फ्रीडम प्लॅन, केवळ 1 रुपयांत मिळणार बरंच काही

कंपनीच्या आगामी स्मार्टफोनबाबत यूजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आगामी स्मार्टफोनचा टिझर कंपनीच्या एका एग्जीक्यूटिवने शेअर केला आहे. या टिझरमध्ये कंपनीच्या आगामी स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी कथित वनप्लस एस 6 अल्ट्रा अलीकडेच देशातील एका प्रमाणन डेटाबेसवर आढळून आला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा आगामी स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 9000 चिपसेटवर आधारित असणार आहे.

OnePlus Ace 6 सीरीज स्मार्टफोन कधी होणार लाँच?

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये वनप्लस चाईनाचे प्रेसिडेंट ली जी लुईस यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक नवीन वनप्लस Ace सीरीज स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच हा टिझर वनप्लसच्या अधिकृत Weibo पेजवर देखील अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये लिहीले आहे की, वनप्लसच्या Ace नवीन प्रोडक्ट्सचा महिना अधिकृतपणे सुरू झाला आहे. यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, Ace सीरीजचा हा अपकमिंग स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरपर्यंत चीनमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X) 

मात्र टेक कंपनीने अद्याप या नव्या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. तसेच आगामी स्मार्टफोनचे नाव, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स किंवा लाँच डेट कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. त्यामुळे आता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, येणाऱ्या काही आठवड्यांत हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. तसेच कंपनी स्मार्टफोनबाबत सर्व डिटेल्स देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका अहवालानुसार, अलीकडील अहवाल, लीक आणि अफवांच्या आधारे, हा टीझर वनप्लस एस 6 अल्ट्राशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

Ai+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये कथित OnePlus Ace 6 Ultra चीनच्या MIIT सर्टिफिकेशन डेटाबेसवर स्पॉट करण्यात आला होता. यामुळे असे संकेत मिळत आहेत की, हा फोन एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, OnePlus Ace 6 Ultra मध्ये फ्लॅगशिप ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 चिपसेट असण्याची शक्यता आहे. यामध्ये एक प्लॅट डिस्प्ले असू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz पर्यंत असू शकतो. आगामी स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Oneplus ace 6 ultra teased launch expected soon with flagship features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
1

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
2

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
3

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
4

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.