भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 6 स्मार्टफोन 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता भारतात लाँच केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये आगामी स्मार्टफोनचे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर येणार आहेत. असं सांगितलं जात आहे की, OnePlus Nord 6 स्मार्टफोनची किंमत 35,000 ते 40,000 रुपयांदरम्यान असणार आहे. या फोनमध्ये प्रोसेसिंग पावर, हाय-फ्रेमरेट गेमिंग आणि मोठी बॅटरी दिली जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Nord, but newer.
Fast in play. Cool all the way.#OnePlusNord6 April 7, 7PM IST Stay tuned: https://t.co/zG8KkUqQ8f pic.twitter.com/KpJWbu4SF9 — OnePlus India (@OnePlus_IN) March 24, 2026
कंपनीच्या आगामी OnePlus Nord 6 मध्ये क्वालकॉम का पावरफुल स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 चिपसेट दिला जाणार आहे. 4nm मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर तयार करण्यात आलेला हा चिपसेट 1+3+4 कोर आर्किटेक्चरचा वापर करतो. यामध्ये 3.2GHz पर्यंत क्लॉक स्पीड दिली जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये एक प्रायमरी Cortex-X5 कोर आणि यासोबतच अॅड्रेनो 835 जीपीयू दिला जाणार आहे.
कंपनीने दावा केला आहे की, वनप्लसचा आगामी Nord 6 त्याच्या कॅटेगिरीमधील पहिले असे डिव्हाईस असणार आहे, जे बीजीएमआय, कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल आणि फ्री फायर मॅक्स सारख्या निवडक मोबाईल गेम्समध्ये सातत्याने 165 FPS गेमप्ले देऊ शकते. डिव्हाईसमध्ये 1.5K AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे, ज्यामध्ये 1800 निट्सचा उच्च ब्राइटनेस मोड आणि 3600 निट्सची पीक एचडीआर ब्राइटनेस मिळणार आहे. फोनमध्ये चांगल्या दिशात्मक आवाजासाठी इन-बिल्ट Spatial Audio बूस्टर देखील दिला जाणार आहे. डिव्हाईसमध्ये Aqua Touch 2.0 फीचर देखील मिळणार आहे, यामुळे डिस्प्ले किंवा यूजरची बोटे ओली असतानाही स्क्रीनचा प्रतिसाद कायम राखण्यास मदत होईल.
कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 9000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी सिलिकॉन-कार्बन टेक्नोलॉजीचा वापर करते. कंपनीचा दावा आहे की, सामान्य वापरात एकदा चार्ज केल्यावर बॅटरी अडीच दिवसांपर्यंत टिकू शकते. तसेच बॅटरी 26.9 तासांपर्यंत यूट्यूब स्ट्रीमिंग किंवा 60 एफपीएसवर 6.3 तासांपर्यंत 4 के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकते. हे डिव्हाइस 80 वॅट सुपरव्हूक वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते असं देखील सांगितलं जात आहे.






