Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

ChatGPT Work AI: एआय क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल टाकत चॅटजीपीटी वर्क नावाचा नवीन एआय एजेंट सादर केला आहे. हा एआय एजेंट फक्त प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर रिसर्च, डॉक्युमेंट्स, प्रेझेंटेशन आणि संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारीही हाताळू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 09:04 AM
OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

Follow Us
Follow Us:
  • ओपनएआयने चॅटजीपीटी वर्क एआय एजेंट लाँच केला असून तो संपूर्ण प्रोजेक्ट हाताळू शकतो.
  • हे एआय एजेंट डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, प्रेझेंटेशन्स आणि वेब ॲप्स तयार करू शकते.
  • चॅटजीपीटी वर्कची सुरुवात प्रो, एंटरप्राइझ आणि एड्यू यूजर्ससाठी करण्यात आली आहे.
टेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAI ने एका नव्या AI एजेंटची घोषणा केली आहे. कंपनीने ChatGPT Work लाँच केले आहे. हे नवीन एआय एजेंट केवळ प्रश्नांची उत्तर देण्यासाठी नाही तर अनेक काम करण्यासाठी देखील डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणं आहे की, हे नवीन एआय एजेंट मोठे आणि कॉम्प्लेक्स टास्क सांभाळण्यासाठी डिझाईन केले आहे. हे एआय एजेंट वेगवेगळ्या ॲप्समध्ये काम करू शकते आणि डाक्यूमेंट्स, स्प्रेडशीट्स, प्रजेंटेशन्स आणि वेब ॲप्ससारख्या पूर्णपणे तयार फाईल्स देखील बनवू शकते.

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

जीपीची-5.6 आणि कोडेक्स

हे एआय एजेंट ओपनएआयच्या सर्वात लेटेस्ट एआय मॉडल जीपीची-5.6 आणि कोडेक्सने सुसज्ज आहे. ओपनएआयने चॅटजीपीटी वर्कचे वर्णन एका अशा एआय एजेंटच्या स्वरूपात केले आहे, जे तुमच्या ॲप्स आणि फाईलवर स्वतः ॲक्शन घेऊ शकते, गरज पडल्यास तासंतास प्रोजेक्टवर टिकून राहू शकते आणि एखाद्या ध्येयाचे पूर्ण झालेल्या कामात रूपांतर करू शकतो.  (फोटो सौजन्य – AI Created)

चॅटजीपीटी वर्क काय काय करू शकते?

तुम्ही केवळ एका सिंगल विनंतीद्वारे चॅटजीपीटी वर्कला संपूर्ण कामाची जबाबदारी सोपवू शकता. उदाहरणार्थ, हे एआय एजेंट कस्टमर रिसर्चला एक मार्केटिंग कँपेन ब्रीफमध्ये बदलू शकते, त्याच्या ब्रिफचा वापर करून मार्केटिंग मटेरियल तयार करू शकते आणि प्रत्येक स्टेपमध्ये एका वर्षााचे कॉन्टेस्क्ट कायम ठेवत वेगवेगळ्या बाजारपेठांनुसार जुळवून घेऊ शकते. हे एआय एजेंट शेड्यूल्ड टास्कला देखील सपोर्ट करू शकते, ज्यामुळे युजर्सना पुनरावृत्ती होणारी कामे स्वयंचलित करता येतात. हे एआय एजेंट रोज सकाळी वेबसाईट तपासते, बदलांचा सारांश तयार करू शकते, नवीन फीडबॅक आल्यास प्रेझेंटेशन अपडेट करू शकते किंवा कस्टमर फीडबॅकवर नजर ठेवून त्याला एखाद्या प्रोडक्ट आइडियाजमध्ये बदलू शकते.

डेस्कटॉपवर, चॅटजीपीटी वर्कमध्ये एक इन-बिल्ट ब्राउजर समाविष्ट आहे जो वेबसाईट आणि ऑनलाइन टुल्सकडून माहिती गोळा करू शकतो. ओपनएआयचे असे म्हणणे आहे की, डेस्कटॉप वर्जन कंप्यूटर वापराला सपोर्ट करतो, जो चॅटजीपीटीला बॅकगाऊंडमध्ये यूजर्सच्या कंप्युटरवर क्लिक करणे, टाईप करणे, फाईल्स हलवणे आणि दुसऱ्या कामांसाठी परवानगी देते. ओपनएआयने पब्लिक बीटामध्ये साइट्स इन चॅटजीपीटी फीचर देखील सादर केले आहे. हे फिचर युजर्सना त्यांचे काम इंटरॅक्टिव्ह वेबसाईट किंवा वेब ॲप्समध्ये बदलण्याची सुविधा देतात, जे दुसऱ्यासोबत सहज शेअर केले जाऊ शकतात.

कंपनीचं म्हणणं आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या कंप्युटर किंवा फोनपासून दूर असता, तेव्हा देखील चॅटजीपीटी वर्क शेड्यूल्ड टास्कद्वारे प्रोजेक्ट्सवर काम करू शकते. उदाहरणार्थ, हे एआय एजेंट माइक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्लॅककडून येणारे नवीन मेसेज स्वतः अपडेटेड डाक्यूमेंट्स किंवा स्लाइड्समध्ये बदलू शकतो आणि यानंतर महत्त्वाचे बदल तुमच्या टीमसोबत शेअर करू शकते.

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

कोणत्या यूजर्ससाठी रोलआऊट केलं नवं एआय एजेंट?

चॅटजीपीटी वर्क सध्या वेब आणि मोबाइलवर प्रो, एंटरप्राइझ आणि एड्यू यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत प्लस आणि बिझिनेस यूजर्ससाठी देखील हे एआय एजेंट रोलआऊट केले जाणार आहे. ओपनएआयने मॅक आणि विंडोज दोन्हीसाठी एक अपडेटेड चॅटजीपीटी डेस्कटॉप ॲप देखील रिलीज केले जाणार आहे. या नव्या ॲपमध्ये चॅटजीपीटी वर्क देखील समाविष्ट असणार आहे, तर आधीपासूनच उपलब्ध असलेल्या डेस्कटॉप ॲपला आता चॅटजीपीटी क्लासिक म्हटलं जाणार आहे.

Web Title: Openai launched chatgpt work ai agent it will help in many tasks from making files to handling projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा
1

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा

Startup Frontier 1.0: मुंबईत भव्य कार्यशाळेचे उद्घाटन; 60 महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू
2

Startup Frontier 1.0: मुंबईत भव्य कार्यशाळेचे उद्घाटन; 60 महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू

Bitcoin Crash: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या हट्टीपणामुळे 5700 कोटींचा चुना, ‘तो’ निर्णय आणि क्रिप्टो कंपनीचा झाला गेम
3

Bitcoin Crash: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या हट्टीपणामुळे 5700 कोटींचा चुना, ‘तो’ निर्णय आणि क्रिप्टो कंपनीचा झाला गेम

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर
4

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.