Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSLR विसरा… 200MP च्या दोन कॅमेऱ्यांसह Oppo स्मार्टफोनची एंट्री, केवळ इतक्या रुपयांत यूजर्सना मिळणार प्रिमियम अनुभव

Oppo Find X9 Ultra Launched: ओप्पोने एका मोठा धमाका करत नवीन स्मार्टफोन लाँत केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या स्मार्टफोनची चर्चा सुरु होती, तो स्मार्चफोन अखेर आता ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2026 | 11:06 AM
DSLR विसरा... 200MP च्या दोन कॅमेऱ्यांसह Oppo स्मार्टफोनची एंट्री, केवळ इतक्या रुपयांत यूजर्सना मिळणार प्रिमियम अनुभव

DSLR विसरा... 200MP च्या दोन कॅमेऱ्यांसह Oppo स्मार्टफोनची एंट्री, केवळ इतक्या रुपयांत यूजर्सना मिळणार प्रिमियम अनुभव

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्रामध्ये 200MP चे दोन कॅमेरे देण्यात आले असून DSLR सारखा फोटो अनुभव मिळतो.
  • स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आणि 120Hz अमोलेड डिस्प्लेमुळे फोनची परफॉर्मन्स आणि व्हिज्युअल्स जबरदस्त आहेत.
  • 7050mAh बॅटरीसह 100W फास्ट आणि 50W वायरलेस चार्जिंगमुळे फोन जलद चार्ज होतो आणि जास्त वेळ टिकतो.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने सर्व स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवली आहे. फोटोग्राफीचा अनुभव अधिक प्रिमियम व्हावा आणि डीएसएलआर कॅमेऱ्यांना टक्कर देता यावी यासाठी कंपनीने चीनमध्ये Oppo Find X9 Ultra लाँच केला आहे. फ्लॅगशिप फाइंड एक्स 9 लाइनअपअंतर्गत हा नवा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने पावरफुल फीचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनचे विशेष आकर्षण म्हणजेच त्याचा कॅमेरा. कंपनीने डिव्हाईसमध्ये 200MP चे दोन कॅमेरे दिले आहेत.

NASA चा धक्कादायक अंदाज! सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवन येणार संपुष्टात? जाणून घ्या काय म्हणाले शास्त्रज्ञ

ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्राची किंमत आणि उपलब्धता

ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्रा 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज, 12GB + 512GB, 16GB + 512GB, 16GB + 1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,03,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,10,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,17,000 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – Oppo)

हाय-एंड कॉन्फिगरेशन 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 9,299 म्हणजेच सुमारे 1,27,000 रुपये आणि CNY 9,499 म्हणजेच सुमारे 1,30,000 रुपयांच्या किंमतीत एक स्पेशल एडिशन व्हेरिअंट सादर करण्यात आला आहे. पोलर ग्लेशियर्स, रोंगशा कॅनियन आणि टुंड्रा (चीनी भाषेतून अनुवादित) या रंगांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसची विक्री 24 एप्रिलपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन भारतात मे महिन्यात लाँच केला जाणार आहे.

ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्राचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डुअल-सिम (नॅनो + नॅनो/ईसिम) फोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड कलरओएस 16 वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 6.82-इंच QHD+ (1,440 x 3,168 पिक्सेल) फ्लेक्सिबल अमोलेड स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, पीक ब्राइटनेस 1,800 निट्सपर्यंत आहे आणि कलर डेप्थ 10-बिट आहे. या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट दिला आहे, ज्यासोबत एड्रेनो 840 जीपीयू, 16 जीबीपर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे.

कॅमेरा सेटअप

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्रामध्ये मागील बाजूला 4 कॅमेऱ्यांचा सेटअप दिला आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर आहे आणि यामध्ये ओआयएस देखील आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 200-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. जो 10x पर्यंत ऑप्टिकल जूम आणि 120x पर्यंत डिजिटल झूमची सुविधा ऑफर करतो. यामध्ये एक डेडिकेटेड कलर रिप्रोडक्शन लेंस देखील समाविष्ट आहे.

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हे हँडसेट 30fps वर 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग, 120fps पर्यंत 4K रेकॉर्डिंग आणि डॉल्बी व्हिजन व्हिडीओ कॅप्चरला सपोर्ट करते. यामध्ये हॅसलब्लॅड इमेजिंग, एक्सपॅन मोड, आणि प्रोफेशनल व्हिडीओ टूल्स सारखे अनेक अ‍ॅडवांस्ड शूटिंग मोड्स देण्यात आले आहेत.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

वाय-फाय 7, ब्लूटूथ, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, बेईडू, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि यूएसबी टाइप-सी सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स स्मार्टफोनमध्ये समाविष्ट आहेत. या हँडसेटचे काही खास व्हेरिअंट तियानटोंग (चीनी भाषेतून अनुवादित) सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि बेईडू सॅटेलाइट मेसेजिंगला देखील सपोर्ट करते. सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.

बॅटरी

ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्रामध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,050mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Oppo find x9 ultra launched with two 200mp cameras know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
1

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
2

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.