Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परफेक्ट फोटो अन् प्रीमियम अनुभव! 200MP कॅमेऱ्यासह नव्या Oppo स्मार्टफोनची एंट्री, फोटोग्राफी होणार प्रो लेव्हल

Oppo Find X9s Pro Launched: ओप्पोने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसने स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये नवा बेंचमार्क सेट केला आहे. स्मार्टफोन यूजर्सचा फोटोग्राफी अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. यामध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 24, 2026 | 10:43 AM
परफेक्ट फोटो अन् प्रीमियम अनुभव! 200MP कॅमेऱ्यासह नव्या Oppo स्मार्टफोनची एंट्री, फोटोग्राफी होणार प्रो लेव्हल

परफेक्ट फोटो अन् प्रीमियम अनुभव! 200MP कॅमेऱ्यासह नव्या Oppo स्मार्टफोनची एंट्री, फोटोग्राफी होणार प्रो लेव्हल

Follow Us
Follow Us:
  • Oppo Find X9s Pro मध्ये 200MP ड्युअल कॅमेऱ्यासह हॅसलब्लॅड-ट्यूनड सेटअप दिला असून 120x झूम आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सपोर्ट आहे.
  • मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेजमुळे हा फोन दमदार परफॉर्मन्स आणि स्मूथ मल्टिटास्किंग देतो.
  • 7,025mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग, 144Hz अमोलेड डिस्प्ले आणि IP68+IP69 रेटिंगमुळे हा स्मार्टफोन प्रिमियम अनुभव देतो.
Oppo Smartphone Launched: चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेक ईव्हेंटमध्ये ओप्पोने Oppo Find X9s Pro हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. 200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहेत. असं सांगितलं जात आहे की, नव्या स्मार्टफोनमुळे आात स्मार्टफोन फोटोग्राफीचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. दमदार कॅमेऱ्यासह या स्मार्टफोनमध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहे. ओप्पोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

DSLR विसरा… 200MP च्या दोन कॅमेऱ्यांसह Oppo स्मार्टफोनची एंट्री, केवळ इतक्या रुपयांत यूजर्सना मिळणार प्रिमियम अनुभव

ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रो ची किंमत आणि उपलब्धता

ओप्पोचा नवीन स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB+1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 12GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 73,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 78,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 82,000 रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप-ऑफ-द-लाइन 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 96,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 24 एप्रिल रोजी या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असून ग्राहक ओप्पोच्या ऑनलाईन स्टोअरवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रो एनर्जेटिक ऑरेंज, फ्री व्हाइट, नेटिव्ह टायटॅनियम आणि रायडिंग द विंड (चिनी भाषेतून भाषांतरित) या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – Oppo)

ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रो एक डुअल सिम स्मार्टफोन आहे, जो ओप्पोच्या लेटेस्ट अँड्रॉईड 16-बेस्ड कलरओएस 16 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच फुल एचडी+ (1,216 x 2,640 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 300Hz चा टच सँपलिंग रेट, 1.07 बिलियन कलर्स, 460 पीपीआयचे पिक्सेल डेंसिटी, 95.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट ऑफर करतो.

चिपसेट

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 चिपसेट दिले आहे, जे 4.21GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या फोनमध्ये आर्म माली एमसी 12 जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील देण्यात आले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हँडसेट धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग ऑफर करतो.

कॅमेरा

ओप्पो फाइंड एक्स 9 एस प्रोमध्ये हॅसलब्लॅड-ट्यून्ड क्वाड रियर कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा 200-मेगापिक्सेल (f/1.6) चा आहे, ज्यामध्ये ऑटोफोकस आणि टू-एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) फीचर आहे,. या हँडसेटमध्ये 200-मेगापिक्सेल (f/2.6) चा टेलीफोटो पेरिस्कोप कॅमेरा देखील आहे, ज्यामध्ये टू-एक्सिस OIS आणि 120x पर्यंत डिजिटल जूम दिले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे, जो 120-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू ऑफर करतो. सेकेंड जनरेशन डान्क्सिया कलर रिप्रोडक्शन सेंसर देखील यामध्ये समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32-मेगापिक्सेल (f/2.4) चा सेल्फी कॅमेपा दिला आहे. हा फोन 8K/30 fps पर्यंतच्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.

ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास

बॅटरी

ओप्पोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,025mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 7, ब्लूटूथ, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, बेईडू, क्यूजेडएसएस, ग्लोनॅस, गॅलीलियो आणि NavIC सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आले आहे.

Web Title: Oppo find x9s pro launched with 200mp camera now photography experience will be become pro level tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित
1

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित

एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स
2

एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत
3

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या
4

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.