ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास
जॉन टर्नस यांच्यासोबतचा एक फोटो टिम कूक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये टिम कूक आणि जॉन टर्नस दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि ज्या कंपनीने तुम्हाला नेहमीच आमच्या कामाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, तिचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दलही धन्यवाद. हा निरोप नाही. हे जॉनचे स्वागत आहे आणि तुम्ही त्याला माझ्यासारखेच ओळखावे यासाठी मी उत्सुक आहे! (फोटो सौजन्य – X)
जॉन टर्नस अॅपलच्या अशा निवडक लीडर्सपैकी आहेत, ज्यांनी कंपनीच्या सर्वात खास आणि प्रसिद्ध प्रोडक्ट्सना आकार देण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली आहे. गेल्या 25 वर्षांपासून जॉन टर्नस अॅपलसोबत जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांना प्रोडक्ट-फोकस्ड लीडर मानले जात आहे. जॉन टर्नस तंत्रज्ञान आणि यूजरचा अनुभव यांचा मेळ घालण्यात माहिर असलेले इंजीनियर म्हणून ओळखले जातात.
I want to thank everyone for the outpouring of love and thank you for believing in me to lead the company that has always put you at the center of our work. This is not goodbye. It’s a hello to John and I can’t wait for you to get to know him like I do! 🙏 pic.twitter.com/Q43QDG3UmZ — Tim Cook (@tim_cook) April 21, 2026
टर्नस यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. अॅपल कंपनीत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी वर्च्युअर रिसर्च सिस्टिममध्ये देखील काम केले होते. त्यांनी 2011 मध्ये अॅपलसोबत आपला प्रवास सुरु केला आणि 2013 मध्ये हार्डवेयर इंजीनियरिंगटे वाइस प्रेसिडेंट बनले. त्यानंतर 2021 मध्ये ते कंपनीच्या एग्जीक्यूटिव टीममध्ये सहभागी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जॉन टर्नस यांनी अॅपलच्या अनेक फ्लॅगशिप प्रोडक्ट्सच्या डेवलपमेंटचे नेतृत्व केले आहे. यामध्ये आयफोन, आयपॅड, मॅक, ॲपल वॉच आणि एअरपॉड्स यांचा देखील समावेश आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी मॅक लाइनअप पुन्हा एक पावरफुल करण्यासाठी आणि नवीन डिझाइन नवकल्पना अंमलात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांना ॲपलच्या हार्डवेअर व्यवसायाला नवी दिशा देणारा चेहरा म्हणूनही ओळखले जाते.






