Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Selfie ची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा

वेगवेगळ्या पोझ देत Selfie क्लिक करायला आणि सोशल मीडियावर अपलोड करायला प्रत्येकाला आवडतं. अनेकजण तर रोज सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. तुम्ही देखील असच करत आहात का? सावध व्हा... एका सेल्फीमुळे तुमचा डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 07:45 PM
सेल्फीची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा

सेल्फीची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा

Follow Us
Follow Us:
  • AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘पीस साइन’ Selfie मधून फिंगरप्रिंट डेटा कॉपी केला जाऊ शकतो.
  • फोटोमध्ये बोटं स्पष्ट दिसत असतील तर हॅकर्सना बायोमेट्रिक डेटा मिळण्याचा धोका वाढतो.
  • एकदा फिंगरप्रिंट डेटा चोरी झाला तर तो पासवर्डप्रमाणे बदलता येत नाही, त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
आजच्या काळात दोन बोटांनी ‘पीस साइन’ दाखवतं सेल्फी क्लिक करणं एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. हा एक ट्रेंड बनला आहे. तुम्ही देखील ‘पीस साइन’ दाखवत सेल्फी करताय का? ही सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामागील कारण असणार आहे एआय. आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI मुळे आपलं जीवन सोपं झालं असलं तरी अनेक धोके देखील वाढले आहेत. कारण आता एआयच्या मदतीने हॅकर्स लोकांच्या फोटोमधील बायोमॅट्रिक डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच ‘पीस साइन’ दाखवतं क्लिक केलेल्या सेल्फीमधून हॅकर्स एआयच्या मदतीने तुमचा डेटा चोरू शकतात.

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

सेल्फीमधून फिंगरप्रिंट डेटा कॉपी केला जाऊ शकतो

अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या साध्या सेल्फीमधून देखील फिंगरप्रिंट डेटा कॉपी केला जाऊ शकतो. विशेषत: ‘पीस साइन’ दाखवतं क्लिक केलेल्या सेल्फीसाठी हा धोका अधिक आहे. कारण या फोटोमध्ये लोकांची बोटे अगदी स्पष्टपणे फोटोमध्ये दिसत असतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने एका लाईव्ह डेमोममध्ये दाखवले आहे की, सध्याचे तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे आणि धोकादायक देखील बनले आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने लाईव्ह डेमोमध्ये एका सेलिब्रिटीच्या फोटोमधून केवळ बोटांचे छायाचित्र काढून फिंगरप्रिंट पॅटर्न नमुना पुन्हा कसा तयार करता येतो, हे दाखवले. म्हणजेच तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो देखील सायबर गुन्हेगारांना आमंत्रण देऊ शकतात. तुमचा बायोमॅट्रिक डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतो.

तज्ज्ञ काय म्हणाले?

तज्ज्ञांचे असं म्हणणं आहे की, फोटो सुमारे 5 फुटांच्या अंतरावर क्लिक करण्यात आला असेल आणि बोटं फोटोमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत असतील तर एआयच्या मदतीने फिंगरप्रिंट डेटा अगदी सहजपणे कॅप्चर केला जाऊ शकतो. तसेच थोड्या अंतरावरून क्लिक करण्यात आलेल्या फोटोमध्ये देखील एआयच्या मदतीने काही प्रमाणात डिटेल्स मिळू शकतात.

लोकांचा गैरसमज हॅकर्ससाठी फायद्याचा

अनेक लोकांना असे वाटतं की, मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बोटं अस्पष्ट दिसतात, ज्यामुळे कोणताही धोका नसतो. मात्र लोकांचा हाच गैरसमज हॅकर्ससाठी फायदेशीर ठरू शकतो. AI आधारित फोटो एन्हांसमेंट टूल्स आता अस्पष्ट फोटो देखील हाय क्वालिटी ईमेजमध्ये बदलू शकतात. हेच एआय आधारित तंत्रज्ञान हॅकर्सना फिंगरप्रिंट पॅटर्न समजण्यासाठी आणि कॉपी करण्यासाठी मदत करू शकते.

Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स

सर्वात मोठी चिंता म्हणजेच पासवर्डप्रमाणे फिंगरप्रिंट बदलू शकत नाही. जर एखादा व्यक्ती पासवर्ड विसरला तर नवीन पासवर्ड तयार केला जाऊ शकतो. फिंगरप्रिंटच्या बाबतीत असं घडत नाही. पण बायोमेट्रिक डेटा एकदा चोरी झाला की हॅकर्स त्याचा दिर्घकाळासाठी वापर करू शकतात. या बायोमॅट्रिक डेटाच्या मदतीने बँक अकाउंट, डिजिटल पेमेंट सिस्टिम आणि ओळखीसंबंधित अनेक गोष्टी धोक्यात येऊ शकतात. यामुळे आता प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना तसेच आपला फोटो कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘पीस साइन’ सेल्फी धोकादायक का मानला जातो?

    Ans: कारण अशा फोटोमध्ये बोटं स्पष्ट दिसत असल्याने AI च्या मदतीने फिंगरप्रिंट डेटा कॉपी केला जाऊ शकतो.

  • Que: AI खरंच फोटोमधून फिंगरप्रिंट चोरू शकतो का?

    Ans: होय, प्रगत AI आणि फोटो एन्हांसमेंट तंत्रज्ञानामुळे फोटोमधील बोटांचे पॅटर्न ओळखणे शक्य होत आहे.

  • Que: कोणत्या प्रकारच्या फोटोमध्ये धोका अधिक असतो?

    Ans: ज्या फोटोमध्ये बोटं जवळून आणि स्पष्ट दिसतात, त्या फोटोमध्ये डेटा चोरीचा धोका जास्त असतो.

Web Title: Peace sign selfies could be risky ai raises threat of fingerprint data theft cyber experts warn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
1

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
2

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
3

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
4

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.