अरेरे! बिल भरायचं विसरून गेलात? अहो, टेंशन घेऊ नका; PhonePe मध्ये आलंय नवीन फीचर, पेमेंट रिमाइंडर आणि ऑटो पेसाठी करणार मदत
ऑनलाईन पेमेंट अॅप फोनपेने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. जे लोकं वीज बिल, मोबाईल रिचार्ज किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या पेमेंटची तारीख विसरतात अशा लोकांसाठी हे फीचर सुरु करण्यात आलं आहे. अनेकदा असं होतं की आपल्याला वीज बिल भरायचं असतं, पण आपण तारीख विसरतो आणि मग बिल भरायचं राहून जातं. पण आता असं होणार नाही. कारण आता वीज बिल कधी भरायचं, तुमच्या फोनचा रिचार्ज कधी करायचा आहे, या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आता फोनपे तुम्हाला मदत करणार आहे.
फोनपेने त्यांच्या युजर्ससाठी पेमेंट रिमाइंडर आणि ऑटो पेसाठी करणार मदत करणार एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर अगदी क्षणार्धात तुमच्या सर्व समस्या सोडवणार आहे. त्यामुळे आता कोणतंही पेमेंट करण्यासाठी किंवा बिल भरण्यासाठी तुम्हाला कॅलेंडर पुन्हा पुन्हा पाहण्याची किंवा रिमाइंडर्स सेट करण्याची गरज राहणार नाही. कारण आता फोनपेने त्यांच्या अॅपमध्ये पेमेंट रिमाइंडर आणि ऑटो पे पर्याय जोडला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही पेमेंटची तारीख, रक्कम आणि बिलर अॅडव्हान्समध्ये सेट करू शकता. यानंतर तुम्ही जी तारीख सेट केली आहे, त्यादिवशी तुम्हाला एक रिमाइंडर पाठवलं जाणार आहे. यावेळी तुम्ही पाठवलेल्या रिमाइंडरनुसार पेमेंट करू शकता. जर तुम्हाला पेमेंट करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही ऑटो पे हा पर्याय देखील निवडू शकता. जर तुम्हाला दर महिन्याला निश्चित तारखेला तुमचे पेमेंट आपोआप करायचे असेल, तर फोनपेचे ऑटोपे फीचर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रिमाइंडर आणि ऑटोपे सेट करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.