POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या
पोको एक्स 8 च्या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि पोको एक्स 8 पावरची किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2 हजार रुपयांचे कूपन डिस्काऊंट आणि 1 हजार रुपयांचे एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस देखील ऑफर करत आहे. या ऑफर्सनंतर स्मार्टफोन्सची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आणि 32,999 रुपये होणार आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 11 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. पोको एक्स 8 पावर ब्लॅक आणि येलो कलर ऑप्शन्समध्ये तर पोको एक्स 8 ब्लॅक, फायरी ऑरेंज आणि फ्रॉस्ट व्हाइट शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Poco)
पोको एक्स 8 पावर आणि पोको एक्स डुअल-सिम स्मार्टफोन्स आहेत, जे शाओमीच्या अँड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो. कंपनीने या दोन्ही डिव्हाईससाठी 4 मोठे ओएस अपग्रेड्स आणि 6 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स देणयाचे वचन दिले आहे. कंपनीच्या या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.83-इंच 1.5K (1,280 x 2,772 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, एचडीआर 10+, डॉल्बी व्हिजन, 3,200Hz पर्यंत इंस्टेंटेनियस टच सँपलिंग रेट, 3,500 निट्सची पीक ब्राइटनेस, 100% DCI-P3 कलर गॅमट, TUV ट्रिपल आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन, वेट टच 2.0 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग्स दिली आहे.
परफॉर्मंससाठी पोको एक्स 8 पावरमध्ये क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे, जो 2.6GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देतो. तसेच, पोको एक्स 8 मध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 चिपसेट मिळणार आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 2.4GHz पर्यंत आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ॲड्रेनो जीपीयू दिला आहे. पावर मॉडेलमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे, तर स्टँडर्ड मॉडेल एलपीडीडीआर4एक्स रॅमने सुसज्ज आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, पोको एक्स 8 पावर आणि पोको एक्स 8 मध्ये रियर पॅनलवर डुअल कॅमेरा यूनिट दिले आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्टवाला 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा सेंसर आहे. पावर मॉडेलमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर पोको एक्स 8 मध्ये 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर दिला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एक्स 8 पावरमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर पोको एक्स 8 मध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट शूटर दिला आहे.
पोको एक्स 8 पावरमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी दिली आहे. पोको एक्स 8 मध्ये 67W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 9,000mAh बॅटरी दिली आहे.






