Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

Recharge Plan Prices Update: मोबाईल ग्राहकांना पुन्हा मोठा झटका बसणार असून आता देशातील टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. हा निर्णय पुढील 3 ते 4 महिन्यांत होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2026 | 09:30 AM
Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

Follow Us
Follow Us:
  • पुढील 3 ते 4 महिन्यांत मोबाईल रिचार्जच्या किंमती 12 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
  • 5G सेवांची वाढती मागणी आणि मर्यादित स्पर्धेमुळे टेलिकॉम कंपन्यांना दरवाढ करणे सोपे होऊ शकते.
  • जिओ आणि एअरटेलचा बाजारहिस्सा वाढण्याची, तर व्होडाफोन आयडियाचा हिस्सा आणखी कमी होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
Recharge Plan Update: देशभरातील मोबाईल यूजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढीस 3 ते 4 महिन्यांत भारतातील टेलिकॉम कंपन्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीत 12 ते 15 टक्क्यांनी वाढ करू शकतात. असं सांगितलं जात आहे की, टेलिकॉम बाजारात प्रतिस्पर्धा कमी असणं आणि 4जी आणि 5जी सेवांच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्यांसाठी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणं अतिशय सोपं झालं आहे.

राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च या टेलिकॉम आणि इंटरनेट ब्रोकरेज फर्मने शेअर केलेल्या एका अहवालानुसार, भारतीय टेलिकॉम बाजारातील बाजारातील मोठ्या कंपन्यांची संख्या मर्यादित आहे. यामुळे टॅरिफ वाढवले जाणार असल्याची शक्यता अधिक दाट झाली आहे. जर कंपनीने रिचार्जच्या किंमतीत 12 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला तर याचा परिणाम प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांवर होऊ शकतो. या दोन्ही ग्राहकांना रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात. (फोटो सौजन्य – AI Created)

एआरपीयूमध्ये वाढ

रिपार्टनुसार, मोबाईल यूजर्स सध्या मोठे संख्येने 5जी नेटवर्ककडे वळत आहेत. याशिवाय देशातील पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे जून तिमाहीत दूरसंचार कंपन्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसुल (ARPU) 1 ते 1.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, उत्तम नेटवर्क सेवा आणि जास्त डेटाचा वापर होत असल्यामुळे कंपन्यांच्या कमाईत सतत वाढ होत आहे. सेंट्रमने म्हटले आहे की, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांचा बाजारहिस्सा (मार्केट शेअर) वाढणे सुरूच राहील आणि तो व्होडाफोन आयडियाच्या हिश्श्यातून मिळवला जाईल.

अशी शक्यता वर्तवली जात आहे की, जून तिमाहीमध्ये भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली रिलायंस जियो सुमारे 70 लाख नवीन ग्राहक जोडू शकते. तर दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एयरटेल सुमारे 50 लाख नवीन ग्राहक जोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर वोडाफोन आइडिया केवळ 2 लाख नवीन ग्राहक जोडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tech Tips: Google Account सुरक्षित ठेवायचंय? लगेच बदला या 5 महत्त्वाच्या सेटिंग्ज… नाहीतर करावा लागेल पश्चात्ताप

ब्रॉडब्रँड सेवांच्या मागणीत झपाट्याने वाढ

भारतात गेल्या काही वर्षांपासून ब्रॉडबँड सेवांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. रिपार्टमध्ये आता असं सांगितलं जात आहे की, जियो आणि एयरटेलने आतापर्यंत देशातील 90 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. कंपन्या सध्या जास्तीत जास्त 5जी स्मार्टफोन यूजर्सना त्यांच्या नेटवर्कसोबत जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय, 5जी आधारित फिक्स्ड वायरलेस एक्सेस (एफडब्ल्यूए) आणि ब्राडबँड सेवांच्या मागणीत देखील झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वोडाफोन आयडिया त्यांच्या 5जी नेटवर्कचा विस्तार करत असून ते 100 शहरांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, कंपनीची एजीआर थकबाकीही कमी झाली आहे.

Web Title: Private telecom companies may rise recharge plan prices in india read in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
4

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.