तुमच्या स्मार्टफोनमधील मॅसेज डिलीट करताय? आधी सुप्रिय कोर्टाने दिलेला निर्णय वाचा (फोटो सौजन्य - pinterest)
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आजच्या काळात स्मार्टफोन वापरतात. कॉलिंग, मॅसेजिंग, चॅटिंग, या सर्वासोबतच स्मार्टफोनचा आणखी बराचं उपयोग आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती शोधू शकतो. कोणताही गुन्हा घडला की त्याची लेटेस्ट अपडेट स्मार्टफोनवर उपलब्ध होते. सर्वसामान्य माणसं जसं गुन्ह्याबाबत माहिती मिळण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात, त्याचप्रमाणे पोलीस देखील गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुन्हेगाराचा स्मार्टफोन तपासतात.
हेदेखील वाचा- फेसबुक, इंस्टाग्राम की व्हॉट्सॲप… कोणत्या प्लॅटफॉर्मचे आहेत सर्वाधिक युजर्स?
कोणताही गुन्हा घडला की, पुरावा शोधण्यासाठी सर्वप्रथम गुन्हेगाराचा स्मार्टफोन शोधला जातो. कारण कॉल, मॅसेज या माध्यमातून गुन्ह्याचे पुरावे मिळण्याची शक्यता असते. मात्र गुन्हेगार किंवा त्यांच्या साथीदारांकडून अनेक वेळा फोनमधून मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ डिलीट केले जातात. त्यामुळे मोबाईलवरील मॅसेज डिलीट करणं गुन्हा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता सुनावणी पार पडली आहे. स्मार्टफोनवरून मॅसेज आणि कॉल डिलीट करणे म्हणजे पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने यावेळी म्हटले आहे की, स्मार्टफोनमधून संदेश डिलीट करणे गुन्हा मानला जात नाही.
याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं आहे की आजच्या काळात लोक वेगाने जुन्या तंत्रज्ञानाकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत लोक जुन्या स्मार्टफोनवरून नवीन स्मार्टफोनकडे वळतात. अशा परिस्थितीत जुन्या फोनमधील लिंक, फोटो, मॅसेज किंवा व्हिडिओ डिलीट होऊ शकतात. न्यायमूर्ती बीआर आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की, मोबाईल वेळोवेळी अपग्रेड केले जातात, त्यामुळे फोनमधील जुने मॅसेज डिलीट होऊ शकतात. तसेच, न्यायालयाने स्मार्टफोनला खासगी बाब मानली आहे. म्हणूनच गोपनीयतेच्या कारणास्तव स्मार्टफोनमधील संदेश आणि इतर कागदपत्रे किंवा व्हिडिओ आणि फोटो हटविले जातात. त्यामुळे हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही.
हेदेखील वाचा- भारतात सुरू झाली Instagram Creator Lab! क्रिएटर्सना मिळणार फेमस होण्यासाठी खास मंत्र
यासोबतच फोनमधून अनावश्यक मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी डिलीट करावेत, असे मोबाइल तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण जास्त स्टोरेज असल्याने काही वेळा फोनचा वेग कमी होतो. म्हणूनच फोनचा स्पीड वाढवण्यासाठी फोनमधून फोटो, व्हिडीओ आणि मॅसेज नियमितपणे काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिने त्याचे खासगी फोटो, व्हिडीओ किंवा मॅसेज त्याच्या मोबाईलवरून हटवले तर तो गुन्हा कसा मानला जाऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नुकतेच केंद्र सरकारने आयटी कायद्यात बदल केले आहेत आणि एक नवीन नियम जोडला आहे. विशेषत: सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मोबाईलवरून कॉल करून किंवा संदेश पाठवून कोणालाही धमकी दिली तर त्याला भारतीय कायद्यानुसार दंड होऊ शकतो. याशिवाय त्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.