Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Realme 16T Launched: टेक कंपनीने भारतात त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 29,999 रुपयांच्या सरुवातीच्या किंमतीत नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 02:06 PM
स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप... 50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप... 50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • Realme 16T मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंच डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी IMX852 कॅमेरा आणि AI आधारित लुमाकलर इमेज इंजिन सपोर्ट मिळतो.
  • नव्या 5G फोनमध्ये 45W सुपरवूक फास्ट चार्जिंगसह 8000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Realme Smartphone Launched: टेक कंपनी Realme ने भारतात त्यांचा बहुप्रतिक्षित Realme 16T स्मार्टफोन अखेर लाँच केला आहे. कंपनीने या नव्या स्मार्टफोनसोबतच Realme Buds Air 8 Pro आणि Realme Watch S5 देखील भारतात लाँच केले आहेत. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे.

Lenovo चं गेमर्सना खास सरप्राईज! 2K गेमिंग डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Realme 16T ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्टारलाईट ब्लॅक, स्टारलाईट ब्लू आणि स्टारलाईट रेड रंगाच्या पर्यायात खरेदी करू शकणार आहेत. ग्राहक फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाच्या वेबसाईटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Realme)

लाँच ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना 3,000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. तर ग्राहक 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआई पर्यायावर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 1000 रुपयांचा आणखी फायदा होणार आहे. Realme 16T स्मार्टफोनची प्री बुकिंग 26 मेपासून सुरु होणार आहे. स्मार्टफोनची विक्री 27 मेपासून सुरु होणार आहे.

Realme 16T चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ 90.4 टक्के आहे.

प्रोसेसर

टेक कंपनी रिअलमीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित रिअलमी UI 7 वर चालतो. यामध्ये स्प्लिट-स्क्रीन मल्टीटास्किंग, फ्लोटिंग विंडो, स्क्रीन रिकॉर्डिंग, ओप्पो शेयर आणि iOS फाइल शेयरिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत.

कॅमेरा

कंपनीच्या नव्या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी IMX852 प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा अपर्चर f/1.8 आहे, जो ऑटोफोकस सपोर्टसह येतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये रिअलमीचे लुमाकलर इमेज इंजिन दिले आहे, जे एआय प्रोसेसिंगच्या मदतीने स्किन टोन, टेक्चर आणि डायनमिक रेंज सुधारते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

कनेक्टिविटी पर्याय

Realme 16T स्मार्टफोन 5G, VoWiFi, ब्लूटूथ 5.3, आयपीव्ही 6, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि बेईडू या कनेक्टिविटी पर्यायांनी सुसज्ज आहे. या फोनमध्ये IP69 रेटिंग दिली आहे. फोनमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी व्हेपर चेंबर आणि ग्राफाइट कूलिंग सिस्टीम आहे. सिक्योरिटीसाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन… ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो

बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट

नव्या डिव्हाईसमध्ये 45W सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये बायपास चार्जिंग फीचर देखील आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, केवळ 104 मिनिटांत फोन फुल चार्ज केला जाऊ शकतो.

 

Web Title: Realme 16t smartphone launched in india with amazing features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
2

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
4

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.