WhatsApp Tips: व्हॉट्सअॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन... ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो
जर तुम्हाला वाटत असेल की, फोटो आणि व्हिडीओची क्वालिटी खराब होऊ नये, यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपमधील एचडी मीडिया फीचरचा वापर करू शकता. विशेष म्हणजेच, आता यूजर्स एचडी क्वालिटी कायमस्वरुपासाठी डीफॉल्ट सेटिंग म्हणून देखील ऑन करू शकतात. याव्यतिरिक्त, गरज असल्यास यूजर्स प्रत्येक फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना देखील एचडी पर्याय निवडू शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)






