Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Realme Narzo Power 5G: रियलमीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 06, 2026 | 11:52 AM
राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर... Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर... Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटवाला 6.78-इंच डिस्प्ले
  • स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये
  • लाँच ऑफरअंतर्गत स्मार्टफोनच्या खरेदीवर 4000 रुपयांचे डिस्काऊंट
टेक कंपनी Realme ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Realme Narzo Power 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 10,001mAh बॅटरी देण्यात आली आहे. Narzo सीरीजचा हा स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 अल्ट्रा 5G चिपसेटने सुसज्ज आहे. रियलमीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटवाला 6.78-इंच डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 6500 निट्स आहे.

Nothing चा भारतात धमाका! नव्या स्मार्टफोन्सनी जिंकली यूजर्सची मनं; डिझाईन आणि फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा.. क्या बात है!

रियलमी नार्जो पॉवर 5G किंमत आणि ऑफर्स

रियलमी नार्जो पॉवर 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. तर दुसऱ्या 8GB रॅम+ 256GB स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे. रियलमीचा फोन टाइटन सिल्वर आणि टाइटन ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. रियलमी नार्जो पॉवर 5G लाँच ऑफरअंतर्गत स्मार्टफोनच्या खरेदीवर 4000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. या फोनवर 3000 रुपयांची बँक सूट आणि 1 हजार रुपयांची अतिरिक्त डिस्काऊंट दिली जात आहे. यासह, रियलमी फोन 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. टॉप व्हेरिएंट 25,999 रुपयांना खरेदी करता येईल. या रियलमी फोनची विक्री अ‍ॅमेझॉन आणि रियलमीच्या ऑनलाईन स्टोअरवर आधीच सुरू झाली आहे. कंपनी सुरुवातीच्या खरेदीदारांना 2999 रुपयांमध्ये 4 वर्षांची बॅटरी वॉरंटी देखील देत आहे. (फोटो सौजन्य – X)

रियलमी नार्जो पॉवर 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

रियलमी नार्जो पॉवर 5G स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटवाला 6.8-इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रेजोल्यूशन 1280×2800 पिक्सेल, टच सँपलिंग रेट 240Hz आणि स्क्रीन टू बॉडी रेशिओ 94 टक्के आहे. या रियलमी फोनवरील डिस्प्ले HDR10+ सर्टिफिकेशनसह येतो आणि त्याची कमाल ब्राइटनेस 6500 निट्स आहे.

परफॉर्मेंस

रियलमी नार्जो पॉवर 5G मध्ये ओक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अल्ट्रा 5G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी आर्म माली-G615 GPU दिला आहे. या फोनमध्ये 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256 जीबी यूएफएस 3.1 स्टोरेज दिले आहे.

कॅमेरा

रियलमी नार्जो पॉवर 5G स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे, जो सोनी IMX882 सेंसर आहे. हा ऑटोफोकस आणि 2-axis OIS सपोर्टसह येतो. फोनचा सेकेंडरी कैमरा 8-मेगापिक्सेलचा आहे. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

कनेक्टिविटी

रियलमी केइस फोनमध्ये डुअल सिम सपोर्ट (5G/4G) सह वाय-फाय 5, ब्लूटूथ, बेइदौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलीलियो आणि क्यूजेडएसएसचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये अँबिंट लाइट, कलर टेंप्रेचर, ई-कम्पास, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि आईआर ब्लास्टर जसे सेंसर देखील आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

बॅटरी आण चार्जिंग

रियलमी नार्जो पॉवर 5G मध्ये 10,001mAh ची लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की या फोनची 10000 एमएएच बॅटरी फक्त 85 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते.

सॉफ्टवेयर आणि इतर फीचर्स

रियलमी नार्जोचा हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित रियलमी UI 7.0 वर चालतो. या फोनला IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह हाय-रेझ ऑडिओ प्रमाणपत्र आणि मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स मिळते.

Web Title: Realme narzo power 5g launched in india with 10001mah battery and amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nothing चा भारतात धमाका! नव्या स्मार्टफोन्सनी जिंकली यूजर्सची मनं; डिझाईन आणि फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा.. क्या बात है!
1

Nothing चा भारतात धमाका! नव्या स्मार्टफोन्सनी जिंकली यूजर्सची मनं; डिझाईन आणि फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा.. क्या बात है!

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर
2

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत
3

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर
4

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.