Realme P3 Series Launched: बाजारात धुमाकूळ घालणार Realme ची नवीन सिरीज, अंधारातही चमकणार लेटेस्ट स्मार्टफोन
स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आज 18 फेब्रुवारी रोजी भारतात त्यांच्या P सिरीजमधील नवीम स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme ने आज भारतात Realme P3 सिरीज लाँच केली असून या सिरीजमध्ये Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. लाँचिंगपूर्वीच Realme P3 ची क्रेझ प्रचंड वाढली आहे आणि याचं कारण आहे स्मार्टफोनचा बॅक पॅनल. स्मार्टफोन ग्लो इन द डार्क फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. म्हणजे अंधारात स्मार्टफोनचा बॅक पॅनल चमकणार आहे. हा आगळा वेगळा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आला आहे.
Call Merging Scam: अरे देवा, बाजारात पुन्हा आला नवा स्कॅम! कॉल मर्ज करताच सेंड होईल ओटीपी आणि…
ग्लो इन द डार्क शिवाय या स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले, ज्यामुळे तरूण वर्ग या स्मार्टफोनकडे आकर्षित होणार आहे. Realme P3x 5G हा MediaTek Dimensity 6400 SoC प्रोसेसरसह लाँच केलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे, तर Realme P3 Pro 5G मध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट आहे. एवढं सगळ असून देखील स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme P3 Pro 5G मध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर आहे. याशिवाय, यात 6050mm² VC कूलिंग सिस्टम देखील आहे, जी चांगली कामगिरी आणि हीट मॅनेजमेंट प्रदान करेल. हा या सेगमेंटमधील सर्वात पातळ स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, या अनोख्या स्मार्टफोनमध्ये FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो जो एक उत्तम विजुअल अनुभव देतो. कंपनीने हा फोन सॅटर्न ब्राउन आणि गॅलेक्सी पर्पल अशा दोन रंगांमध्ये लाँच केला आहे. नेब्युला ग्लो व्हेरिअंटचा मागील पॅनल अंधारात चमकणार आहे. यामध्ये ग्लो इन द डार्क फीचर आहे. त्याची जाडी 7.99mm असेल आणि त्याला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहील. त्याच्या मागील बाजूस 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे जो फोटोग्राफीचा उत्तम अनुभव देईल.
आता Realme P3x 5G स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 SoC प्रोसेसरसह बाजारात आणला आहे जो त्याला शक्तिशाली परफॉर्मन्स देतो. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देखील आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 50 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
IMI चे OpenAI वर गंभीर आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण
कंपनीने हा फोन मिडनाईट ब्लू, लुना सिल्व्हर आणि स्टेलर पिंक अशा तीन रंगांमध्ये लाँच केला आहे. विशेषतः मिडनाईट ब्लू व्हेरियंटमध्ये व्हेगन लेदर बॅक पॅनल आहे, ज्यामुळे त्याचा लूक अधिक प्रीमियम बनतो. त्याला IP68+IP69 रेटिंग मिळाले आहे ज्यामुळे ते पाणी आणि धूळपासून सुरक्षित राहील.
कंपनीने Realme P3 Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये ठेवली आहे. 8GB+256GB व्हेरिअंट 22,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 25 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. Realme P3x 5G च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB+128GB व्हेरिअंट 13,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री 28 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. तुम्ही हे दोन्ही फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसेच ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.