Call Merging Scam: अरे देवा, बाजारात पुन्हा आला नवा स्कॅम! कॉल मर्ज करताच सेंड होईल ओटीपी आणि... Call Merging Scam: अरे देवा, बाजारात पुन्हा आला नवा स्कॅम! कॉल मर्ज करताच सेंड होईल ओटीपी आणि...
स्कॅमर्स आणि हॅकर्स यांच्यापासून सुरक्षित राहण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. कारण आपली एक चूक आपलं संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं करू शकते. स्कॅमर्स आणि हॅकर्सच्या नवीन स्कॅमबाबत आपल्याला सतत सावध राहण्याचा इशारा दिला जात असतो. आता देखील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. याचं कारण म्हणजे बाजारात सुरु असलेला नवीन स्कॅम.
सध्या स्कॅमर्स आणि हॅकर्सनी लोकांची फसवूणक करण्यासाठी नवीन स्कॅम शोधला आहे, आणि हा स्कॅम आहे कॉल मर्जिंग स्कॅम. या घटनांमध्ये युजर्सना कॉल मर्ज करण्यासाठी सांगितलं जाते आणि त्यांच्या नकळत वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळवला जातो. एकदा स्कॅमर्सना OTP मिळाला की, त्यांना इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते. (फोटो सौजन्य – Pinterest)
असे अनेक लोकं आहेत, त्यांना या स्कॅमबद्दल माहिती नाही. त्यामुळे स्कॅमर्स आणि हॅकर्सपासून सावध राहण्यासाठी आणि तुमचं नुकसान होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कॉल मर्जिंग स्कॅमबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचे पैसे चोरीला जाऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्हाला या नवीन स्कॅमबद्दल सर्वकाही माहित असणे आवश्यक आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने त्यांच्या X अकऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये कॉल मर्जिंग स्कॅमबाबत माहिती देण्यात आली आहे.
Scammers are using call merging to trick you into revealing OTPs. Don’t fall for it! Stay alert and protect your money. 🚨💳 Share this post to spread awareness!#UPI #CyberSecurity #FraudPrevention #StaySafe #OnlineFraudAwareness #SecurePayments pic.twitter.com/kZ3TmbyVag
— UPI (@UPI_NPCI) February 14, 2025
UPI ने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, स्कॅमर्स कॉल मर्जिंग वापरून तुमचा ओटीपी चोरत आहेत, ज्यामुळे तुमचे बँक अकाऊंट सहजपणे रिकामे होऊ शकते. या जाळ्यात अडकू नका, जागरूक रहा आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवा.
हा स्कॅम एका अज्ञात कॉलने सुरू होतो. तुम्हाला एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. यानंतर, दुसऱ्या बाजूचा व्यक्ती दावा करते की त्याला तुमचा नंबर त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळाला आहे. यानंतर ते तुम्हाला असेही सांगते की ती व्यक्ती वेगळ्या कॉलवर आहे, त्यानंतर लगेच तुमचा कॉल एका दुसऱ्या कॉलसोबत मर्ज केला जातो. कॉल्स मर्ज होताच, तुम्ही नकळत बँकेकडून येणाऱ्या ओटीपी व्हेरिफिकेशन कॉलशी कनेक्ट होता, त्यानंतर तुमच्या फोनवर येणारे ओटीपी स्कॅमर्सच्या फोनवर जाऊ लागतात. आणि यानंतर केवळ काही क्षणातच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होतं.
iOS 18.4 Update: कधी रिलीज होणार iPhone चं नवीन अपडेट, काय असणार खास? इथे जाणून घ्या सर्वकाही
जेव्हा तुम्हाला अज्ञात स्त्रोताकडून येणारे कॉल मर्ज करण्यास सांगितले जाते तेव्हा सावधगिरी बाळगा. जर कोणी तुमच्या बँकेतून किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला कॉल करत असल्याचा दावा करत असेल, तर कोणतीही माहिती देण्यापूर्वी कॉलरची पडताळणी करा. जर तुम्हाला तुमच्या नकळत कोणताही OTP मिळाला तर तुम्ही त्याची तक्रार करावी. तुम्ही 1930 वर कॉल करून याबद्दल तक्रार करू शकता, जेणेकरून वेळेवर कारवाई करता येईल.