Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Realme स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या भारतीय ग्राहकांना आता मोठी झटका बसणार आहे. कारण कंपनीने त्यांच्या काही स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन मॉडेल्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांन जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 28, 2026 | 01:43 PM
Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या 'या' स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या 'या' स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Follow Us
Follow Us:
  • रिअलमी P4 पॉवरच्या तिन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत प्रत्येकी 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
  • P4x, P4R आणि P4 लाइट 5G च्या विविध व्हेरिअंट्सच्या किंमतीत 1 ते 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • P4 लाइट 4G ची किंमतही वाढली असून, कंपनीने या दरवाढीबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
टेक कंपनी रिअलमीने भारतातील यूजर्सना पुन्हा एकदा झटका दिला आहे, कंपनीने भारतात त्यांच्या अनेक स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. अलीकडेच वनप्लस, ओप्पो आणि विवोसारख्या टेक ब्रँड्सने देखील त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता रिअलमीने देखील त्यांच्या काही स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. एका टिप्स्टरने दिलेल्या माहितीनुसार, रिअलमी P4 पॉवर, P4x, P4R, P4 लाइट 5G आणि P4 लाइट 4G सारख्या मॉडेल्सच्या व्हेरिअंट्सच्या किंमती 1 ते 3 हजार रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.

4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट… नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

रिअलमी P4 पॉवरच्या नवीन किंमती

टिप्स्टर संजू चौधरीने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, रिअलमी P4 पॉवरच्या तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत 3 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. डिव्हाईसचे 8GB + 128GB व्हेरिअंट आता 29,999 रुपयांऐवजी 32,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये होती. आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 34,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये होती, जी आता 37,999 रुपये झाली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

Price hike alert🚨
realme increases the price of their smartphone by upto ₹3k:
P4 power:
• 8/128GB: ₹29,999 → ₹32,999
• 8/256GB: ₹31,999 → ₹34,999
• 12/256GB: ₹34,999 → ₹37,999
P4x:
• 6/128GB: ₹22,999 → ₹24,999
• 8/128GB: ₹24,999 → ₹27,999
P4R:
•… pic.twitter.com/juSE42lHAI
— Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) August 27, 2026

रिअलमी P4x च्या नवीन किंमती

कंपनीने रिअलमी P4x च्या किंमतीत देखील वाढ केल्याची माहिती आहे. डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये झाली आहे. ही किंमत पूर्वी 22,999 रुपये होती. तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत पूर्वी 24,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 27,999 रुपये खर्च करावे लागणार आहे.

रिअलमी P4R च्या नवीन किंमती

स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 1 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता हे व्हेरिेअंट खरेदी करण्यासाठी 18,999 रुपयांऐवजी 19,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, 4GB + 128GB व्हेरिअंट आता 20,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये झाली आहे. मात्र या व्हेरिअंट्च्या किंमती पूर्वी अनुक्रमे 22,999 रुपये आणि 24,999 रुपये होत्या.

रिअलमी P4 लाइट 5G च्या नवीन किंमती

रिअलमी P4 लाइट 5G च्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. आता या डिव्हाईसचे 4GB + 64GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 16,499 रुपयांऐवजी 17,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, आता 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे. हि किंमत पूर्वी 18,499 रुपये होती. 6GB + 128GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 20,999 रुपयांऐवजी 22,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

तसेच, रिअलमी P4 लाइट 4G च्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 1 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 13,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 4GB + 128GB मॉडेलची किंमत 2 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये मोजावे लागणार आहेत. स्मार्टफोनच्या या वाढत्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जाहिर केले नाही. मात्र नवीन किंमती रिअलमी इंडियाच्या वेबसाईटवर दिसत आहेत.

Web Title: Realme smartphone price hike in india p4 power p4x p4r and p4 lite prices increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी
1

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी

4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट… नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
2

4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट… नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार Apple चा बहुप्रतिक्षित ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार एंट्री? जाणून घ्या सविस्तर
3

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार Apple चा बहुप्रतिक्षित ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार एंट्री? जाणून घ्या सविस्तर

वाईट, वाईट अत्यंत वाईट! iPhone 18 खरेदी करायचा आहे? मात्र 9 सप्टेंबरला केवळ ‘हे’ प्रॉडक्टसच…
4

वाईट, वाईट अत्यंत वाईट! iPhone 18 खरेदी करायचा आहे? मात्र 9 सप्टेंबरला केवळ ‘हे’ प्रॉडक्टसच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.