Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत… खरेदीपूर्वी तपासा नवीन दर

Redmi Smartphone Price Hike: रेडमी 15 5G किंवा रेडमी नोट 15 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आता या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 11:37 AM
Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत... खरेदीपूर्वी तपासा नवीन दर

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत... खरेदीपूर्वी तपासा नवीन दर

Follow Us
Follow Us:
  • Redmi 15 5G आणि Redmi Note 15 5G स्मार्टफोन्सच्या सर्व व्हेरिअंट्सची किंमत कंपनीने 2 हजार रुपयांनी वाढवली आहे.
  • वाढलेल्या किंमतींची माहिती शाओमीच्या लीक झालेल्या पार्टनर डॉक्युमेंटमधून समोर आली आहे.
  • जागतिक बाजारात रॅम आणि मेमरी चिप्सच्या वाढत्या किंमतीमुळे स्मार्टफोन्स महाग होत असल्याचे सांगितले जात आहे.
Redmi Price Hike: काही दिवसांपूर्वी टेक कंपनी वनप्लसने त्यांच्या काही स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्याची घोषणा केली होती. यानंतर यूजर्सनी प्रचंड नाराजी देखील व्यक्त केली होती. वनप्लसनंतर आता आणखी एका टेक कंपनीने स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक मोठा धक्का बसला आहे.

Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा

रेडमीने घेतला मोठा निर्णय

टेक कंपनी रेडमीने मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या त्यांच्या दोन 5G फोन्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये Redmi 15 5G आणि Redmi Note 15 5G या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. जर तुम्ही आता या दोन्हीपैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत सुमारे 2 हजार रुपयांनी वाढवली आहे. या नव्या किंमती आजपासून लागू झाल्या आहेत. खरं तर, ही दरवाढ शाओमीच्या एका लीक झालेल्या पार्टनर डॉक्युमेंटमधून उघडकीस आली आहे. याबाबत टिपस्टर संजू चौधरीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केले आहे. असं सांगितलं जात आहे की, ही एक इंटरनल माहिती आहे, जी Mi होम स्टोर्स आणि ऑफलाइन ट्रेड पार्टनर्सना पाठवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Redmi 15 5G व्हेरिअंटच्या च्या नव्या किंमती

डिव्हाईसचे 6GB + 128GB व्हेरिअंट 18,499 रुपयांच्या किंमती लाँच करण्यात आले होते. मात्र आता ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 20,499 रुपये खर्च करावे लागणार आहे. तर 20,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,499 रुपये झाली आहे. स्मार्टफोनचे 8GB + 256GB व्हेरिअंट रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता याची किंमत 24,499 रुपये झाली आहे.

Redmi Note 15 5G व्हेरिअंटच्या च्या नव्या किंमती

या स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट 24,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता त्याची किंमत 26,999 रुपये झाली आहे. तर 27,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या 8GB + 256GB व्हेरिअंटसाठी आता ग्राहकांना 29,999 रुपये खर्च करावे लागणार आहे. कंपनीने सर्व व्हेरिअंटची किंमत 2 हजार रुपयांनी वाढवली आहे.

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

2026 मध्ये का वाढत आहेत स्मार्टफोनच्या किंंमती?

केवळ रेडमीनेच नाही तर इतर अनेक स्मार्टफोन्स ब्रँड्सनी देखील त्यांच्या डिव्हाईसच्या किंमती वाढवल्या आहेत. भारतात स्मार्टफोनची विक्री करणारा प्रत्येक ब्रँड सध्या डिव्हाईसच्या किंमती वाढवण्यावर भर देत आहे. जागतिक बाजारपेठेत रॅमचा तुटवडा आणि एआय डेटा सेंटर्सकडून वाढती मागणी हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे मेमरीच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. परिणाम स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये देखील वाढ होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Redmi कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Redmi हा Xiaomi चा स्मार्टफोन ब्रँड आहे आणि ही कंपनी चीनची आहे.

  • Que: Redmi चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Redmi स्मार्टफोन कमी किमतीत चांगले फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखले जातात.

  • Que: Redmi फोनमध्ये 5G सपोर्ट मिळतो का?

    Ans: होय, Redmi कडे बजेटपासून प्रीमियमपर्यंत अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Redmi smartphone price hike company increase prices of redmi 15 5g and redmi note 15 5g tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.