Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच... प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा
Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास
ओप्पो रेनो 16 स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3499 युआन म्हणजेच सुमारे 49,040 रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3899 युआन म्हणजेच सुमारे 54,650 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3999 युआन म्हणजेच सुमारे 56,050 रुपये आहे. ओप्पो रेनो 16 च्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4299 युआन म्हणजेच सुमारे 60,255 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत 4899 युआन म्हणजेच सुमारे 68,665 रुपये ठेवली आहे. (फोटो सौजन्य – X)
ओप्पो रेनो 16 प्रो स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4499 युआन म्हणजेच सुमारे 63,000 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4899 युआन म्हणजेच सुमारे 68,665 रुपये ठेवली आहे. डिव्हाईसच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 5299 युआन म्हणजेच सुमारे 74,260 रुपये आहे. दोन्ही नव्या स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये 29 मेपासून ओप्पो ऑनलाईन स्टोअरद्वारे सुरु होणार आहे. ओप्पो रेनो 16 हा गॅलेक्सी पर्पल, हार्टबीट आणि मूनलाइट इज डार्क या रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर ओप्पो रेनो 16 प्रो हा ड्रीम व्हाइट, हार्टबीट आणि मूनलाइट इज डार्क या शेड्समध्ये येतो.
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, सिरीजच्या प्रो मॉडेलमध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यासोबत 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला ओप्पो रेनो 16 मध्ये 6.32-इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 460 पीपीआय पिक्सेल डेंसिटी आणि प्रो मॉडेलसारखेच फीचर्स मिळणार आहेत.
ओप्पो रेनो 16 प्रोमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट देण्यात आला आहे. तर नॉन प्रो रेनो 16 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 8550 सुपर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईस 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहेत. दोन्ही डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP69K रेटिंग दिली आहे.
फोटोग्राफीसाठी ओप्पो रेनो 16 प्रो आणि ओप्पो रेनो 16 मध्ये एकसारखे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 200-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनची सुविधा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये मागील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि यासोबतच 50-मेगापिक्सेल (f/2.8) चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देखील आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईस 4K/60 fps पर्यंत क्वालिटीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकते.
कंपनीने लाँच केलेल्या प्रो मॉडेलमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. तर रेनो 16 मध्ये 6,700mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही डिव्हाईस 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
Ans: OPPO ही चीनची स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
Ans: होय, Oppo स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, कॅमेरा क्वालिटी आणि फास्ट चार्जिंगसाठी प्रसिद्ध आहेत.
Ans: Oppo फोनमध्ये AI कॅमेरा, नाईट मोड आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी प्रगत फीचर्स दिले जातात.






