सॅमसंग लॉंच करणार नवीन स्मार्टफोन्स (फोटो- ai gemini)
सॅमसंग नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी ए सिरीज लाँच करणार
सुस्पष्टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्चर करण्याची कॅमेरा क्षमता
दोन स्मार्टफोन्समध्ये नवीन एआय वैशिष्ट्यांची भर
मुंबई: सॅमसंग भारतात आपले नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी ए सिरीज स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज आहे. नवीन स्मार्टफोन्स गॅलेक्सी ए 57 5जी आणि गॅलेक्सी ए37 5जी पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या नवीन स्मार्टफोन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्चर करण्याची कॅमेरा क्षमता असेल. या दोन स्मार्टफोन्समध्ये नवीन एआय वैशिष्ट्यांची भर होण्याची देखील शक्यता आहे, ज्याला सॅमसंग ‘ऑसम इंटेलिजन्स’ म्हणते.
गॅलेक्सी ए 57 5जी आणि गॅलेक्सी ए37 5जी धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी 68 टिकाऊपणासह लाँच होऊ शकतात. या स्मार्टफोन्समध्ये दीर्घकालीन सिक्युरिटी अपडेट्स आणि ओएस अपग्रेड्स असतील, जो सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्सचा हॉलमार्क आहे. गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी एआय युगामध्ये सर्वोत्तम डेटा सुरक्षिततेसाठी हार्डवेअर-आधारित तंत्रज्ञान सॅमसंग नॉक्स वॉल्टसह येतील.
गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी या स्मार्टफोन्समध्ये सर्वोत्तम कार्यक्षमतेसाठी अपग्रेडेड प्रोसेसर्स, वाय-फाय ६ई आणि ब्ल्यूटूथ ६ असण्याची शक्यता आहे. नवीन डिवाईसेस किफायतशीर दरांमध्ये प्रीमियम वैशिष्ट्ये सादर करण्याच्या सॅमसंगच्या ग्राहक-अनुकूल धोरणाला दाखवतील. गॅलेक्सी ए सिरीज सॅमसंगची भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सिरीज आहे, जेथे देशभरात एकूण जवळपास १०० दशलक्ष युनिट्सची विक्री झाली आहे.
आता थांबू नका कारण 20 मार्चपासून…; मार्केट हादरणार! Samsung ने आणला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन
Samsung ने आणला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन
Galaxy एम सिरीज सॅमसंगची सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन लाइन-अप आहे आणि Galaxy M17e 5G या वारसा अधिक दृढ करतो. या स्मार्टफोनमध्ये प्रमुख स्मार्टफोन वैशिष्ट्यांमधील विश्वसनीय कार्यक्षमता व दैनंदिन उपयुक्ततेसह सुलभ डिस्प्ले, दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी, कार्यक्षम परफॉर्मन्स, क्षमतापूर्ण कॅमेरे व इंटेलिजण्ट सॉफ्टवेअर आहे, ज्यामुळे भारतातील तरूण ग्राहकांच्या गतीशील गरजांची पूर्तता होते.
Galaxy M17e 5G तुमच्या जीवनशैलीला कार्यरत ठेवण्यासाठी शक्तिशाली 6000 एमएएच बॅटरीसह येतो. अधिक कॅज्युअल गेमिंग सत्रांपासून मॅरेथॉन्स पाहण्याचा मनसोक्त आनंद व दीर्घकाळापर्यंत व्हिडिओ कॉल्सपर्यंत ही बॅटरी स्मार्टफोनला दिवसभर कार्यरत ठेवते, ज्यामधून विनाव्यत्यय उत्पादकता व मनोरंजनाचा आनंद घेता येतो. वन यूआय 8 द्वारे ऑप्टिमाइज करण्यात आलेला गॅलेक्सी एम१७ई ५जी सर्वोत्तमपणे ऊर्जा वापराचे व्यवस्थापन करतो, ज्यामुळे डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री मिळते.






