Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A08 Launched: सॅमसंगने भारतात नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 02, 2026 | 09:16 AM
बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत नवा स्मार्टफोन लाँच
  • नवा स्मार्टफोन सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • गॅलेक्सी ए 08 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप
Samsung Smartphone Launched:टेक कंपनी सॅमसंगने भारतात नवा Samsung Galaxy A08 लाँच केला आहे. 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यांचे बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

सॅमसंग गॅलेक्सी ए 08 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने नवा स्मार्टफोन सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 4GB + 64GB याचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन डार्क ब्लू, ग्रीन आणि सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. हे हँडसेट सॅमसंगच्या एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, पार्टनर रिटेलर्स, सॅमसंग.कॉम आणि दूसऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सॅमसंग पात्र बँक कार्ड्सवर सहा महिन्यांपर्यंत आणि एनबीएफसी पार्टनर्सद्वारे नऊ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय प्लॅन्स ऑफर करणार आहे. (फोटो सौजन्य: Samsung) 

सॅमसंग गॅलेक्सी ए 08 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

एलसीडी पॅनल

सॅमसंग गॅलेक्सी ए 08 अँड्रॉईड 16 वर आधारित वन यूआय 9 वर चालतो आणि सहा जनरेशनच्या ओएस अपग्रेड्स आणि सहा वर्षांच्या सिक्योरिटी अपडेट्सला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाला 6.7-इंच एचडी+ पीएलएस एलसीडी पॅनल देण्यात आला आहे.

प्रोसेसर

गॅलेक्सी ए 08 मीडियाटेक हेलिओ जी99+ चिपसेटने सुसज्ज आहे, याला 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. स्मार्टफोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डचा वापर करून 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. पासवर्ड आणि बायोमेट्रिक माहिती यासारखी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हँडसेटमध्ये सॅमसंग नॉक्स प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

एआय फीचर्स

गॅलेक्सी ए 08 मध्ये सर्कल टू सर्च 3.0, जेमिनी आणि परप्लेक्सिटीचा सपोर्ट मिळणार आहे. यूजर्स बोलून किंवा पावर बटण दाबून जेमिनी आणि परप्लेक्सिटीचा ॲक्सेस मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, सॅमसंगच्या ‘गॅलेक्सी इकोसिस्टम’चा भाग म्हणून, हा फोन ‘क्विक शेअर’ आणि ‘मोड्स अँड रुटीन्स’ यांनाही सपोर्ट करतो.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी, गॅलेक्सी ए 08 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर आणि f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला f/2.0 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

बॅटरी

सॅमसंगने गॅलेक्सी ए 08 मध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट 6,000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसच्या समोरील बाजूला गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन मिळणार आहे. पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.

Web Title: Samsung galaxy a08 launched in india in budget segment read features and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.