
दमदार कॅमेरा, AI फीचर्स आणि प्रीमियम डिझाइन, सॅमसंगकडून Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच
मुंबई : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज गॅलेक्सी ए सिरीजमधील नवीन स्मार्टफोन्स गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी लाँच केले. गॅलेक्सी ए सिरीज फोटोग्राफी, कार्यक्षमता, एआय-सक्षम दैनंदिन वैशिष्ट्ये आणि टिकाऊपणाला प्राधान्य देणाऱ्या तरूण युजर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. गॅलेक्सी ए५७ ५जी अॅल्युमिनियम फ्रेमसह ६.९ मिमी जाडीमध्ये येत असून, हा सर्वात सडपातळ ए सिरीज डिव्हाइस आहे. याचे स्लिम बेझल्स अधिक संतुलित आणि उत्कृष्ट व्ह्यूइंग अनुभव देतात.
गॅलेक्सी ए५७ ५जी मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, व्हिजन बूस्टर आणि १९०० निट्स ब्राइटनेस दिला आहे, ज्यामुळे बाहेरही स्पष्ट व्ह्यू मिळतो. ए५७ ५जी आणि ए३७ ५जी दोन्हीमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ (फ्रंट व बॅक) आणि आयपी६८ रेटिंगसह मजबूत संरक्षण आहे. तसेच, या डिव्हाइसेसना सहा अँड्रॉईड ओएस अपग्रेड्स आणि ६ वर्षांची सिक्युरिटी मिळते.
गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन आणि १.० µm (मायक्रॉन) मोठे पिक्सल सेन्सर आहे, तसेच सुधारित इमेज सिग्नल प्रोसेसिंग (आयएसपी) आणि लो नॉईज मोड आहे. यामुळे अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्टपणे आकर्षक फोटोज कॅप्चर होण्याची खात्री मिळते.
गॅलेक्सी ए५७ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. गॅलेक्सी ए३७ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. दोन्ही डिवाईसेसमध्ये आकर्षक सेल्फीज व व्हिडिओ कॉल्ससाठी १२ मेगापिक्सल एचडीआर फ्रण्ट कॅमेरा आहे.
गॅलेक्सी ए५७ ५जी मध्ये एक्झिनॉस १६८० (३३ टक्के अधिक एनपीयू) आणि ए३७ ५जी मध्ये एक्झिनॉस १४८० (१६२ टक्के सुधारित एनपीयू) दिले आहेत. दोन्हीमध्ये एलपीडीडीआर५एक्स रॅम आ आणि यूएफएस ३.१ स्टोरेजमुळे जलद परफॉर्मन्स मिळतो. ए५७ ५जी मध्ये १३% मोठे वेपर कूलिंग चेंबर असून, ते गेमिंग आणि जड वापरादरम्यान तापमान नियंत्रणात ठेवते.
गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी जवळपास २ दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकते. ४५ वॅट चार्जिंग सपोर्टसह या नवीन डिवाईसेसमधील बॅटरी ३० मिनिटांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
गॅलेक्सी ए५७ ५जी आणि ए३७ ५जी वन यूआय ८.५ वर चालतात, ज्यामध्ये सॅमसंग बिक्स्बी, जेमिनी व परप्लेक्सिटी सारखी एआय टूल्स दैनंदिन कामे सुलभ करतात। सर्कल टू सर्चसह मल्टी-ऑब्जेक्ट रिकग्निशनमुळे स्क्रीनवरील वस्तू सहज शोधता येतात.
डायरेक्ट वॉईसमेलमुळे वॉईस मेसेजेस थेट डिव्हाइसवर सेव्ह होतात. वॉईस ट्रान्स्क्रिप्शन ह फीचर ऑडिओला टेक्स्टमध्ये रूपांतरित करून मीटिंग किंवा कॉलची माहिती सहज पाहता येते, तर रिअल-टाइम कॉल ट्रान्स्क्रिप्शन कॉलदरम्यान आवाजाचे स्क्रीनवर टेक्स्टमध्ये रूपांतर करते.
गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी सॅमसंग नॉक्स वॉल्टसह येतात, जे हार्डवेअर-स्तरीय हल्ल्यांसाठी समर्पित टेम्पर-रोधक हार्डवेअर व मॉनिटर्समध्ये डेटा स्टोअर करते. या डिवाईसेसमध्ये सॉफ्टवेअर-स्तरीय संरक्षण देखील आहे, जे डेटाचे उल्लंघन झाल्यास वापरकर्त्यांना दक्ष करते.
गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी रिटेल स्टोअर्स, सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, सॅमसंगडॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील. ग्राहक तीन आकर्षक ऑफर्समधून निवड करू शकतात: ३००० रूपये बँक/यूपीआय कॅशबॅक किंवा २४ महिन्यांचे शून्य व्याज, झीरो डाऊन पेमेंट ईएमआय प्लॅन किंवा ३००० रूपये अपग्रेड बोनस.
गॅलेक्सी ए५७ ५जी हे दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ५६,९९९ रुपये असून, १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ६२,४९९ आहे.
तसेच, गॅलेक्सी ए३७ ५जी तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ४१,९९९ रुपये आहे. ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४७,४९९ असून, १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत ५२,९९९ रुपये आहे.