Samsung Galaxy F36 5G: भारतात लाँच झाला सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन, तब्बल 7 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स! इतकी आहे किंमत
साऊथ कोरियन टेक कंपनी Samsung ने अखेर त्यांचा नवीन F-सीरीज फोन, Galaxy F36 5G आज भारतात लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या फोनची चर्चा सुरु होती, तो फोन आता अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून त्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये Exynos 1380 चिपसेटसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.याशिवाय या फोनमध्ये Google चे सर्किल टू सर्च आणि Gemini Live सारखे अनेक AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. फोनची किंमत किती आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
Samsung Galaxy F36 5G ची किंमत 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 17,499 रुपये आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा नवा F-सीरीज स्मार्टफोन 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असेल. हा फोन कोरल रेड, लक्स व्हायलेट आणि ओनिक्स ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. सर्व प्रकारांमध्ये लेदर फिनिश रिअर पॅनल आहे, ज्यामुळे फोनला प्रीमियम लूक मिळतो. (फोटो सौजन्य – X)
India! Go Hi-FAI with the all-new #GalaxyF36 5G – packed with powerful AI features that let you Capture. Edit. Create. Like never before.
✨ From a 50MP OIS advanced Nightography camera that nails every frame, 🪄 to AI powered editing that clean, crop, and perfect your clicks… pic.twitter.com/j92KDA9SDn
— Samsung India (@SamsungIndia) July 19, 2025
Samsung Galaxy F36 5G हा एक डुअल-सिम फोन आहे, ज्यामध्ये 6.7-इंच Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले फुल-HD+ रेजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस+ प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. Samsung Galaxy F36 5G फोन ऑक्टा-कोर Exynos 1380 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्याला Mali-G68 MP5 GPU सह जोडण्यात आले आहे. यामध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी वेपर चेंबर देखील आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी Galaxy F36 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी 50-मेगापिक्सेल f/1.8 सेंसर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) आणि 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. याशिवाय, f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी फोनच्या फ्रंटला 13-मेगापिक्सेल आहे, जो 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.
हा फोन Android 15 बेस्ड One UI 7 वर चालतो. सॅमसंगने 6 जेनेरेशनचे अँड्रॉइड ओएस अपडेट्स आणि 7 वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचा दावा केला आहे. यात गुगलचे सर्कल टू सर्च, जेमिनी लाईव्ह, ऑब्जेक्ट इरेजर, इमेज क्लिपर आणि AI एडिट सजेशन्स सारखे AI फीचर्स देखील आहेत. Galaxy F36 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि USB Type-C पोर्ट देखील आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये डुअल-बैंड Wi-Fi, Bluetooth 5.3 आणि GPS + GLONASS सपोर्ट आहे.