
नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये
कंपनीने हा स्मार्टफोन भारतात 3 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला असल्याचं सांगतिलं जात आहे. कूपन ऑफरसह या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये होणार आहे. स्मार्टफोनची विक्री 4 जुलैपासून सुरु होणार असून ग्राहक हा स्मार्टफोन ॲमेझॉन, ब्रँडची वेबसाइट आणि इतर रिटेल आउटलेट्सवरून खरेदी करू शकतात. रोग रेड आणि ब्लेझ ब्लू या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकणार आहे. (फोटो सौजन्य: सॅमसंग)
सॅमसंग गॅलेक्सी एम 47 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच एफएचडी+ सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. स्मार्टफोनची स्क्रीन स्मूथ स्क्रॉलिंग, दमदार गेमिंग आणि जबरदस्त व्हिडीओ अनुभव ऑफर करण्याचा दावा करते. फोनच्या मजबूतीसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस प्लसची सुरक्षा देण्यात आली आहे.
कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा प्रोसेसर एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेजसह जोडण्यात आला आहे. ज्यामुळे मल्टीटास्किंग, हाई-ग्राफिक्स गेमिंग आणि रोजच्या जीवनात अतिशय स्मूथ अनुभव ऑफर केला जाणार आहे. गेमर्ससाठी यामध्ये बायपास चार्जिंग फीचर देखील देण्यात आले आहे, जे गेमिंगदरम्यान चार्जिंग पावर थेट मदरबोर्डपर्यंत पोहोचवते.
फोटोग्राफीसाठी नव्या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा OIS दिला आहे. याशिवाय, 5MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12MP चा HDR फ्रंट कॅमेरा दिला आहे.
कंपनीने त्यांच्या नवीन सॅमसंग गॅलेक्सी एम 47 5G मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये नॉक्स सिक्युरिटी, प्रायव्हेट अल्बम, घातक वेब ॲक्सेस अलर्ट आणि सॅमसंग वॉलेट (टॅप अँड पे) सारखे सुरक्षा आणि प्रोडक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक एआय फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये ऑब्जेक्ट इरेझर, एडिट सजेशन आणि माय फिल्टर यांचा समावेश आहे. याच्या मदतीने यूजर्स अगदी सहज फोटो एडीट करू शकतात.
ऑपरेटिंग सिस्टमचा विचार करता, सॅमसंग गॅलेक्सी M47 5G हा अँड्रॉइड 16 वर आधारित ‘वन यूआय 8.5 वर चालतो. यामध्ये ‘नाऊ बार’, होम स्क्रीन कस्टमायझेशनचे पर्याय आणि अनेक नवीन सॉफ्टवेअर वैशिष्ट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कंपनीने या फोनसाठी अँड्रॉइड ओएसचे सहा पिढ्यांचे अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.