WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर
GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या
आता तुम्हाला कोणत्याही नवीन व्यक्तिसोबत संवाद साधताना तुमचा नंबर शेअर करण्याची गरज नाही. तुम्ही यूजरनेम शेअर करून देखील समोरील व्यक्तिसोबत चॅटिंग करू शकणार आहात. कंपनीने 29 जून रोजी हे फीचर रिलीज करण्यात आले आहे. आता केवळ यूजर्स त्यांचे यूजरनेम रिजर्व म्हणजेच बुक करू शकणार आहेत. त्यानंतर काही महिन्यांनी या फीचरचा वापर करण्यास सुरुवात होईल. (फोटो सौजन्य: istock)
व्हॉट्सॲपवर कोणत्याही व्यक्तीला मेसेज करण्यासाठी त्याचा नंबर आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. पण आता अस होणार नाही. कारण नवीन फीचरमुळे यूजर्स नंबर शेअर न करता देखील केवळ यूजरनेमच्या मदतीने चॅटिंग करू शकणार आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, जर एखादा यूजर कोणत्याही व्यक्तीला पहिल्यांदा मेसेज करत असेल तर आता त्याचा नंबर नाही तर केवळ यूजरनेम दिसणार आहे. हे एक प्रायव्हसी फीचर आहे. यामुळे यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा दोन्ही वाढणार आहे.
जगभरात व्हॉट्सॲपचे करोडो यूजर्स आहेत. यूजर्सच्या मोठ्या संख्येमुळे एकसारख्या नावांच्या व्यक्तींना एकच यूजरनेम पाहिजे असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच तुम्हाला जे यूजरनेम पाहिजे आहे, तेच यूजरनेम एखाद्या दुसऱ्या यूजरने सेट केले तर? यामुळे तुम्हाला घाई करावी लागणार आहे आणि तुमच्या पसंतीचे यूजरनेम सेट करावे लागणार आहे. यूजरनेम 3 ते 35 अक्षरांपर्यंत सेट केले जाऊ शकते. तसेच कंपनीने प्रसिद्ध व्यक्तींची नाव आधीच रिजर्व केली आहेत, ज्यामुळे त्यांचा कोणीही गैरवापर करू नये.
सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲपचे लेटेस्ट वर्जन अपडेट इंस्टॉल करा. आता सेटिंगमध्ये जा. समोर दिसणाऱ्या अकाऊंट किंवा प्राफाईल पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला खाली यूजरनेम पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे यूजरनेम सेट करू शकता. तुम्ही निवडलेले यूजरनेम उपलब्ध आहे की नाही हे ॲप तुम्हाला सांगणार आहे. ही सुविधा टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या देशांमध्ये सुरु केली जात आहे.






