
Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G चे 12GB + 256GB व्हेरिअंट कंपनीने 80,999 रुपयांच्या किंमती लाँच केले होते. मात्र आता कंपनीने या व्हेरिअंटची किंमत 4,000 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 84,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, स्मार्टफोनचे 12GB + 512GB हे टॉप एंड व्हेरिअंट 92,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. (फोटो सौजन्य: Pinterest)
मात्र आता या व्हेरिअंटची किंमत तब्बल 12 हजार रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना थेट 1,04,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. स्मार्टफोन व्हेरिअंटच्या या नवीन किंमती कंपनीच्या वेबसाईटवर देखील अपडेट करण्यात आल्या आहेत. अद्याप, या स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज या बेस व्हेरिअंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे ग्राहक हा स्मार्टफोन 74,999 रुपयांत खरेदी करू शकतात.
सॅमसंग गॅलेक्सी एस 25 मध्ये 6.2-इंच ॲमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz च्या अडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. याशिवाय हे डिव्हाईस एफएचडी+ रेजोल्यूशनला सपोर्ट करते. बाहेरील वापरताना याची ब्राइटनेस 2,600 निट्सपर्यंत पोहोचू शकते. परफॉर्मंससाठी या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 3nm टेक्नोलॉजीवर आधारित आहे. यासोबतच, या हँडसेटमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन देखील मिळणार आहे.
राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर, हे डिव्हाईस ‘आउट ऑफ द बॉक्स’ अँड्रॉईड 15 वर आधारित वन यूआय 7 स्किनवर चालते. इतकंच नाही तर, कंपनीने या स्मार्टफोनसाठी 7 वर्षांचे ओएस अपग्रेड्स देण्याचे वचन देखील दिले आहे. गॅलेक्सी एस 25 मध्ये 25W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये वायरलेस पावर शेयरिंगचा सपोर्ट देखील मिळणार आहे.