Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung उडवणार सर्वांची झोप! लवकरच लाँच करणार ‘Wide’ फोल्डेबल 5G फोन, 7.6-इंच स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसरने असणार सुसज्ज

सॅमसंगच्या आगामी ईव्हेंटबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हा ईव्हेंट कधी आणि कुठे होणार आणि यामध्ये कोणते डिव्हाईस सादर केले जाणार, याची सतत चर्चा सुरु आहे. आता ईव्हेंटबाबत आणि नव्या डिव्हाईसबाबत माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 11:47 AM
Samsung उडवणार सर्वांची झोप! लवकरच लाँच करणार 'Wide' फोल्डेबल 5G फोन, 7.6-इंच स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसरने असणार सुसज्ज

Samsung उडवणार सर्वांची झोप! लवकरच लाँच करणार 'Wide' फोल्डेबल 5G फोन, 7.6-इंच स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसरने असणार सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung 22 जुलै 2026 ला Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 8 लाँच करण्याची शक्यता.
  • Fold 8 सोबत नवीन Wide फोल्डेबल, 7.6-इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर मिळू शकतो.
  • S Pen सपोर्ट पुन्हा येणार, ज्यामुळे प्रोडक्टिविटी आणि मल्टीटास्किंग अधिक सोपी होईल.
तुम्ही नवीन फोल्ड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. टेक कंपनी सॅमसंग त्यांच्या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत असून हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, येत्या काही दिवसांतच बहुप्रतिक्षित गॅलेक्सी अनफॅक्ड ईव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. कंपनीच्या या आगामी ईव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold 8 सादर केला जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा आगामी ईव्हेंट जुलै 2026 मध्ये आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक खास गॅझेट्स सादर करण्याची देखील शक्यता आहे.

OnePlus घेऊन येतोय ‘Ultra’ मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या

कधी आयोजित केला जाणार गॅलेक्सी अनफॅक्ड ईव्हेंट?

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, 22 जुलै 2026 रोजी लंडनमध्ये कंपनी एका मोठ्या ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे आगामी फोल्डेबल डिव्हाईस सादर करण्याची शक्यता आहे. यामुळे आता सर्व टेकप्रेमींच्या नजरा आगामी ईव्हेंटकडे लागल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Fold 8 सह लाँच केला जणार Wide फोल्डेबल

यावेळी कंपनीच्या स्मनार्टफोनच्या डिझाईनमध्ये केला जाणार आहे. रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, सॅमसंग Galaxy Z Fold 8 सह एक नवीन Wide फोल्डेबल फोन देखील लाँच करणार आहे. यापूर्वी कंपनी मोठ्या स्क्रीन रेशियोसह फोल्ड डिव्हाईस लाँच करण्यावर भर देत होती. मात्र आता आगामी फोल्ड मॉडेलमध्ये अतिरिक्त विस्तृत लेआउट ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे यूजर्सना टॅब्लेटसारखा अधिक चांगला व्ह्यु आणि मल्टीटास्किंग एक्सपीरियंस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्ट्सवरून असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे की, या नव्या फोल्डेबल फोनमध्ये 7.6-इंच इनर डिस्प्ले दिल जाणार आहे. तसेच यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर देखील दिला जाऊ शकतो.

S Pen पुन्हा येणार

रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, सॅमसंग त्यांच्या फोल्डेबल लाइनअपमध्ये S Pen चा पुन्हा एकदा समावेश करणार आहे. जे यूजर्स प्रोडक्टिविटी आणि नोट-टेकिंगला प्राधान्य देतात, अशा यूजर्ससाठी हे फीचर अतिशय फायद्याचं ठरणार आहे.

WhatsApp Update: आता मोबाईल नंबरची गरज नाही! ‘हे’ नवं फीचर दूर करणार यूजर्सची चिंता, नियम आणि अटी जाणून घ्या

फ्लिप मॉडेल कधी लाँच होणार?

शेअर करण्यात आलेल्या रिपोर्ट्समध्ये सॅमसंगच्या Galaxy Z Flip 8 चा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. सॅमसंग सहसा आपल्या ‘अनपॅक्ड’ इव्हेंटमध्ये फोल्ड आणि फ्लिप दोन्ही डिव्हाईस लाँच करते, परंतु यावेळी फोल्ड आणि नवीन वाइड मॉडेलवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

Web Title: Samsung wide foldable phone may launch in upcoming event with big screen and powerful processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • samsung
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! Infinix चा नवा स्मार्टफोन धुरंधर एंट्रीसाठी सज्ज, लाँचपूर्वीच लीक झाले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

अवघे काही तास शिल्लक! Infinix चा नवा स्मार्टफोन धुरंधर एंट्रीसाठी सज्ज, लाँचपूर्वीच लीक झाले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus घेऊन येतोय ‘Ultra’ मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या
2

OnePlus घेऊन येतोय ‘Ultra’ मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या

UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन
3

UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन

GPay मध्ये आले नवे ‘पॉकेट मनी’ फीचर! एकाच UPI ने संपूर्ण कुटूंब करू शकणार पेमेंट, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
4

GPay मध्ये आले नवे ‘पॉकेट मनी’ फीचर! एकाच UPI ने संपूर्ण कुटूंब करू शकणार पेमेंट, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.