Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत

Sharp Aquos R11 Launched: टेक कंपनी शार्पने जपानमध्ये Sharp Aquos R11 हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. प्रिमियम प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 5,100mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 11:02 AM
आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री... 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री... 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • Sharp Aquos R11 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 4 चिपसेट, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50.3MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 50.3MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.
  • 240Hz अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5,100mAh बॅटरी आणि IPX9 रेटिंगसारखे प्रीमियम फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत.
Sharp Smartphone Launched: टेक कंपनी Sharp ने जपानमध्ये त्यांच्या R सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Sharp Aquos R11 लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन आकर्षक डिझाईन आणि तीन रंगाच्या पर्यायांत लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन एका सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार….

Sharp Aquos R11 ची किंमत

कंपनीने जपानमध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन 12GB + 512GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत JPY 1,63,899 म्हणजेच सुमारे 96,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन आइवरी, नेवी आणि टेराकोटा कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)

Sharp Aquos R11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीचा नवा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित आहे आणि कंपनीने पुष्टी केली आहे की, या फोनला तीन ओएस अपग्रेड आणि पाच वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी+ (1,080×2,340 पिक्सेल) प्रो इग्झो ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1Hz ते 240Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा पॅनल 3,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो.

प्रोसेसर

चांगल्या परफॉर्मंससाठी यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB यूएफएस 4.1 इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आले आहे.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी Sharp Aquos R11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्याचा प्रायमरी सेंसर f/1.9 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्टसह 50.3 मेगापिक्सेलचा आहे. सेटअपमध्ये 50.3 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ओआयएस सपोर्टवाला 38.5 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. कॅमेरा सिस्टिममध्ये 14-चॅनलवाला स्पेक्ट्रल सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50.3 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Jio Recharge Plan: एका रिचार्जमध्ये चालणार 4 सिम! 75GB डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

कनेक्टिविटी पर्याय

कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय 7, एनएफसी आणि ब्लूटूथ 6.0 सारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. पाण्यापासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसला IPX5, IPX8 आणि IPX9 रेटिंग मिळाली आहेआणि धूळीपासून सुरक्षेसाठी IP6X रेटिंग दिली आहे. हा फोन एमआयएल-एसटीडी-810जी आणि एमआयएल-एसटीडी-810एच या मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणाच्या मानकांची पूर्तता करतो. सुरक्षेसाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये फेसियल रिकग्निशन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

बॅटरी

Sharp Aquos R11 मध्ये 5,100mAh बॅटरी दिली आहे, जी 36W चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Sharp aquos r11 launched with 5100mah battery and other features read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.