Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

दूरसंचार विभागाने 24 ऑगस्ट 2026 पासून सिम कार्ड संबंधित नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन असतील तर त्या व्यक्तीच्या नावावर आता नवीन मोबाईल कनेक्शन जारी केले जाणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 07:07 AM
SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतके' नंबर

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतके' नंबर

Follow Us
Follow Us:
  • देशातील बहुतांश भागात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात, तर जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा 6 आहे.
  • 24 ऑगस्टपासून मर्यादा पूर्ण झालेल्या ग्राहकांना टेलिकॉम कंपन्या नवीन मोबाईल कनेक्शन देऊ शकणार नाहीत.
  • DIP म्हणजेच डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्मच्या मदतीने वेगवेगळ्या कंपन्यांवरील ग्राहकांचे मोबाईल कनेक्शन तपासले जाणार आहेत.
तुम्ही देखील तुमच्या नावावर अनेक मोबाईल नंबर खरेदी केले आहेत का? तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभाग म्हणजेच DoT ने सिम कार्डबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाचे हे नियम 24 ऑगस्ट 2026 पासून देशभरात लागू केले जाणार आहेत.

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

DoT ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना एक सर्कुलर जारी करत अशा ग्राहकांना ओळखण्याचे निर्देश दिले आहेत ज्यांच्या नावावर आधीपासून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन आहेत. अशा ग्राहकांना स्पष्टपणे सांगितलं जाणार आहे की, ते आता त्यांच्या नावावर कोणतेही मोबाईल कनेक्शन खरेदी करू शकत नाहीत. बनावट सिम कार्ड आणि फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर गरजेपेक्षा जास्त सिम कार्ड जारी केले जाऊ नयेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन

नियमांनुसार, भारतात कोणत्याही व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या टेकलिकॉम कंपन्या आणि सेवा क्षेत्रांमध्ये मिळून जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. तर काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये ही मर्यादा आणखी कमी ठेवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये राहणारे नागरिक त्यांच्या नावावर जास्ती जास्त 6 मोबाईल कनेक्शन खरेदी करू शकतात. तसेच, ग्राहकांना कस्टमर एप्लीकेशन फॉर्म म्हणजेच CAF भरताना माहिती द्यावी लागणार आहे की, त्यांच्या नावावर आधीपासून कोणकोणते मोबाईल कनेक्शन आहेत.

काय आहे नवीन नियम?

डॉटने जारी केलेल्या निर्देशांनुसार, 24 ऑगस्टपासून टेलिकॉम कंपन्यांना अशा ग्राहकांची ओळख पटवावी लागणार आहे, ज्यांनी मर्यादेपर्यंतचे मोबाइल कनेक्शन्स आधीच खरेदी केले आहेत आणि जे नवीन सिम कार्ड घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ग्राहकाकडे आधीच मर्यादेपर्यंतचे मोबाइल कनेक्शन्स असतील, तर टेलिकॉम कंपन्या अशा ग्राहकांसाठी नवीन मोबाईल नंबर जारी करू शकत नाही. तसेच, ग्राहकांच्या नावावर एकूण किती मोबाईल कनेक्शन खरेदी करण्यात आले आहेत, याची माहिती देखील त्यांना दिली जाणार आहे.

डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म

हे नवीन नियम लागू करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना सरकारच्या डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्मची मदत घ्यावी लागणार आहे. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांसंबंधित सब्सक्राइबर डेटा उपलब्ध असणार आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांचे किती मोबाईल कनेक्शन सुरु आहेत, याची माहिती मिळवणं आणखी सोपं होणार आहे.

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

DIP वर दिसणार ग्राहकांचे प्रातिनिधिक छायाचित्रे

नव्या सिस्टिममध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल केला जाणार आहे. रिपोर्टनुसार, 23 ऑगस्टपासून DIP वर असा ग्राहकांचे प्रातिनिधिक छायाचित्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, ज्यांच्याकडे आधीपासूनच लागू मर्यादेपर्यंत मोबाईल कनेक्शन आहेत. याचा वापर टेलिकॉम कंपन्या नवीन कनेक्शनसाठी अर्जदाराची ओळख आणि त्यांच्या कनेक्शनची स्थिती पडताळण्यासाठी करतील.

Web Title: Sim card rule 2026 new rules from august 24 check 9 sim limit and what changes for users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 07:07 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी
1

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
2

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
3

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
4

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.