Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे

PS5 Standard Edition Price Hike: सोनीने भारतीय गेमर्सना मोठा धक्का देत PS5 स्टँडर्ड एडिशनच्या किमतीत तब्बल 15 हजार रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वी अनेक देशांमध्ये दरवाढ केल्यानंतर आता भारतातही नवीन किंमती लागू करण्यात आल्या असून, अधिकृत वेबसाइटवर त्या अपडेट करण्यात आल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2026 | 09:55 AM
गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे

गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे

Follow Us
Follow Us:
  • PS5 स्टँडर्ड एडिशनची किंमत 54,990 रुपयांवरून थेट 69,990 रुपयांपर्यंत वाढली.
  • यापूर्वी PS5 डिजिटल एडिशनची किंमतही 5,000 रुपयांनी वाढवून 49,990 रुपये करण्यात आली होती.
  • अमेरिका, यूके, जपान आणि आग्नेय आशियानंतर आता भारतातही PS5 च्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
सोनी त्यांच्या लोकप्रिय गेमिंग कंसोल PS5 च्या किंमती जागतिक स्थरावर अनेकदा वाढवल्या आहेत. मात्र आता कंपनीने भारतीय यूजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने प्लेस्टेशनच्या किंमती आता भारतात देखील वाढवल्या आहेत. भारतापूर्वी कंपनीने अमेरिका, युनायटेड किंगडम, जपान आणि आग्नेय आशिया भागांमध्ये प्लेस्टेशनच्या किंमती वाढवल्या आहेत. अलीकडेच काही लीक समोर आले आहेत, यामध्ये असं सांगितलं होतं की, कंपनी भारतात देखील त्यांच्या गेमिंग कंसोलच्या किंमतीत वाढ करणार आहे. तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील गेमिंग कंसोलच्या नवीन किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत.

Samsung Galaxy F70 Pro 5G ची भारतात दमदार एंट्री! किंमत, ऑफर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स एकाच ठिकाणी; जाणून घ्या

पीएस5 स्टँडर्ड एडीशन किंमती

कंपनीने यापूर्वी भारतात पीएस5 स्टँडर्ड एडीशन 54,990 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र आता याची किंमत तब्बल 15 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता स्टँडर्ड एडीशन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 69,990 रुपये मोजावे लागणार आहेत. पीएस5 ची नवीन किंमत सोनीच्या अधिकृत ShopAtSC स्टोअरवर देखील अपडेट करण्यात आली आहे. पण सध्या या वेबसाईटवर पीएस5 आउट-ऑफ-स्टॉक आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

पीएस5 च्या किंमतीत पुन्हा वाढ

कंपनीने पहिल्यांदाच पीएस5 च्या किंमतीत वाढ केली नाही. यापूर्वी कंपनीने गेल्यावर्षी जुलै महिन्यात पीएस5 च्या डिजीटल एडीशनची किंमत वाढवली होती. 44,990 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या एडीशनची किंमत तब्बल 5 हजार रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे पीएस5 डिजीटल एडीशन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तब्बल 49,990 रुपये मोजावे लागत आहेत.

जागतिक स्तरावर कंपनीने वाढवली किंमत

भारताव्यतिरिक्त कंपनीने त्यांच्या अनेक प्रोडक्ट्सच्या किंमती जागतिक स्तरावर वाढवल्या आहेत. या यादीमध्ये पीएस5, पीएस5 प्रो आणि प्लेस्टेशन पोर्टल रिमोट इत्यादींचा समावेश होता. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने पीएस5 ची किंमत युके, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका (EMEA), ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये वाढवली होती. त्यावेळी कंपनीने किंमती वाढवण्याचे कारण जागतिक आर्थिक दबाव असल्याचे सांगितलं होते.

Tech Tips: स्टोरेज फुल्ल होण्याची चिंता संपली! फोनच्या गॅलरीमध्ये नाही दिसणार WhatsApp चे फोटो-व्हिडिओ, आत्ताच बदला ‘ही’ सेटिंग

गेल्यावर्षी मार्च महिन्यात पीएस5, पीएस5 प्रो आणि प्लेस्टेशन पोर्टलच्या किंमती वाढवल्या होत्या. ही दरवाढ यूएस, युके आणि जपानमध्ये झाली होती. एप्रिल महिन्यात पीएस5 हार्डवेअरची किंमत आग्नेय आशिया भागांमध्ये वाढवली आहे. ज्यामध्ये थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर आणि व्हिएतनाम इत्यादी समाविष्ट आहे. त्यावेळी भारतातील किंमती वाढवण्यात आल्या नव्हत्या.

Web Title: Sony increase ps5 standard edition price in india now users have to pay more money tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज
2

तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
3

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
4

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.