Samsung Galaxy F70 Pro 5G ची भारतात दमदार एंट्री! किंमत, ऑफर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स एकाच ठिकाणी; जाणून घ्या
सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 6GB+ 128GB, 8GB+ 128GB आणि 8GB+ 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये, 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 8GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अल्फा ब्लॅक आणि ऑरा ग्रीन रंग पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 8 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे वेबसाईटसह फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. स्मार्टफोन 23,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. इतर स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 27,999 रुपये आणि 32,999 रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य: Samsung)
कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एफएचडी+ सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या मिड बजेट फोनच्या प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला विक्टस प्लस दिले आहे. या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन बाईपास चार्जिंगला सपोर्ट करतो.
याशिवाय, स्मार्टफोनमध्ये सर्किल-टू-सर्च आणि गूगल जेमिनी सारखे एआय फीचर्स देखील देण्यात आले आहेत. कंपनी फोनच्या खरेदीवर 6 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स आणि ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड ऑफर करणार आहे. हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित वनयूआई 8.5 सह लाँच केला आहे.
7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित
सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सेलच्या एचडीआर सेल्फी कॅमेरासह उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य ओआयएस कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देखील आहे. या फोनचा मागील कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटवर चालतो आणि यात 8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम व 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.






