Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Digital Wallet Tips: डिजिटल वॉलेटमुळे ऑनलाइन पेमेंट करणे सोपे आणि जलद झाले आहे, मात्र त्यासोबत सायबर फसवणुकीचा धोकाही वाढला आहे. स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी फिशिंग आणि बनावट लिंकसारख्या पद्धतींचा वापर करत असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2026 | 09:36 AM
Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Follow Us
Follow Us:
  • फेक कस्टमर केअरच्या नावाखाली मागितला जाणारा ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा CVV कधीही शेअर करू नका.
  • अनओळखी लिंकवर क्लिक करणे किंवा केवायसी च्या नावाने वैयक्तिक माहिती देणे टाळा.
  • डिजिटल वॉलेट सुरक्षित ठेवण्यासाठी ॲप अपडेट, मजबूत स्क्रीन लॉक आणि व्यवहारांचे अलर्ट नियमित तपासा.
डिजिटल जगात फॉर्म भरण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत आणि शॉपिंग करण्यापासून शिक्षण घेण्यापर्यंत अनेक कामं ऑनलाईन पद्धतीने केली जातात. विशेषत: आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी विविध ॲप्स देखील उपलब्ध आहेत. ऑनलाईन पेमेंटसाठी उपलब्ध असणाऱ्या अनेक ॲप्समध्ये यूजर्सना डिजिटल वॉलेटचा पर्याय दिला जातो.

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

डिजिटल वॉलेटमध्ये तुम्ही एखाद्या दुकानात पेमेंट केल्यानंतर पैसे बँकेतून कापले जाण्याऐवजी ॲप वॉलेटमधून पैसे कापते. खरं तर ही सुविधा अनेकांसाठी फायदेशीर ठरते. मात्र या फायद्यांसोबतच सायबर फ्रॉडचा धोका देखील असतो. त्यामुळे डिजिटल वॉलेटचा वापर करून पेमेंट करणं खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. चला तर डिजिटल वॉलेट नक्की काय आहे, त्याचा वापर करताना कोणते धोके निर्माण होऊ शकतात आणि डिजिटल वॉलेट वापरताना सुरक्षित कसं राहायचं, आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created) 

नक्की काय आहे डिजिटल वॉलेट?

खरं तर, डिजिटल वॉलेट एक असे ॲप किंवा ऑनलाईन सिस्टिम असते, ज्यामध्ये पेमेंटची माहिती डिजिटल स्वरूपात साठवते. यामध्ये बँक अकाऊंट, कार्ड किंवा दुसऱ्या पेमेंट पद्धती लिंक करून पेमेंट केले जाते. ज्यामुळे यूजर्सना प्रत्येकवेळी पेमेंट करताना कॅश किंवा कार्ड बाळगण्याची आवश्यकता नसते. डिजिटल वॉलेट आणि यूपीआय एकसारख्या गोष्टी नाहीत. यूपीआय थेट बँक अकाऊंटमधून पेमेंट करण्याची सुविधा देते. तर, डिजिटल वॉलेटमध्ये ॲपमध्येच पैसे साठवले जातात आणि ते कुठेही वापरता येतात.

डिजिटल वॉलेट वापरताना अशी होऊ शकते फसवणूक

खोट्या कस्टमर केअरपासून सावध राहा

अनेकदा लोकं इंटरनेटवर डिजिटल वॉलेटचा कस्टमर केअर नंबर शोधतात आणि चुकून खोट्या नंबरवर कॉल करतात. अशा परिस्थितीत अनेक लोकांना समजत देखील नाही की, ते ज्या व्यक्तीसोबत कॉलवर बोलत आहेत, तो कस्टमर केअर नाही तर स्वत: स्कॅमर आहे. अशावेळी स्कॅमर्स लोकांची समस्या सोडवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून ओटीपी, पिन किंवा स्क्रीन शेअर करण्यास सांगतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, ओटीपी, यूपीआय पिन, पासवर्ड आणि कार्डचा CVV कोणासोबत कधीही शेअर करू नका.

फिशिंग आणि बनावट लिंक

स्कॅमर्स फिशिंग आणि बनावट लिंकचा वापर करून डिजिटल वॉलेट वापरणाऱ्या यूजर्सची फसवणूक करतात. स्कॅमर्स तुम्हाला बँकेचे अधिकारी, वॉलेट कंपनी किंवा कस्टमर केयर अधिकारी बनून मेसेज करतात. या मेसेजमध्ये खोट्या लिंक जोडलेल्या असतात. स्कॅमर्स वेगवेगळ्या कारणांनी तुम्हाला या लिंकवर क्लिक करण्यासाठी प्रवृत्त करतात. तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमचा पासवर्ड, कार्ड डिटेल्स आणि दुसरी माहिती स्कॅमर्सपर्यंत पोहोचते.

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

असे सुरक्षित ठेवा डिजिटल वॉलेट

डिजिटल वॉलेटचा वापर करताना काही आवश्यक काळजी घेतल्यास तुम्ही स्कॅमर्सपासून सुरक्षित राहू शकतात. तुमच्या फोनमधील ॲप नेहमी अपडेट ठेवा, फोनमध्ये स्क्रीन लॉक ठेवा आणि अनोळखी लिंकपासून लांब राहा. कोणत्याही व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, कोणाच्याही सांगण्यावरून ‘रिमोट-ॲक्सेस’ किंवा ‘स्क्रीन-शेअरिंग’ ॲप्स इंस्टॉल करू नका. तसेच, बँका आणि पेमेंट ॲप्सकडून येणाऱ्या अलर्टकडे लक्ष ठेवा. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यवहाराबाबत माहिती मिळाली, तर तुम्ही त्वरित संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

Web Title: Stay alert while using digital wallet know about cyber fraud risks and how to stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.