Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताडोबाची मोठी कामगिरी! फुलपाखरे ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन AI ॲप लाँच, निसर्गप्रेमींसाठी मोठी भेट

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जैवविविधता संवर्धन आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कशिवाय फुलपाखरांच्या प्रजाती ओळखणारे 'लेपीस्कॅन बटरफ्लाय आयडी' हे देशातील पहिले ऑफलाइन एआय ॲप निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2026 | 02:17 PM
ताडोबाची मोठी कामगिरी! फुलपाखरे ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन AI ॲप लाँच, निसर्गप्रेमींसाठी मोठी भेट

ताडोबाची मोठी कामगिरी! फुलपाखरे ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन AI ॲप लाँच, निसर्गप्रेमींसाठी मोठी भेट

Follow Us
Follow Us:
  • ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने इंटरनेटशिवाय फुलपाखरांच्या प्रजाती ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन एआय ॲप ‘लेपीस्कॅन बटरफ्लाय आयडी’ लॉन्च केले आहे.
  • या ॲपमध्ये सुमारे 1,000 फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश असून मशीन लर्निंगच्या मदतीने काही क्षणांत अचूक ओळख पटते.
  • 25 अतिरिक्त फुलपाखरांच्या नोंदी करणाऱ्या वापरकर्त्यांना वनविभागाकडून मोफत जंगल सफारीची संधी मिळणार आहे.
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जैवविविधता संवर्धन आणि नागरिक विज्ञानाला चालना देण्याच्या दिशेने देशपातळीवर एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘लेपीस्कॅन बटरफ्लाय आयडी’ या अभिनव मोबाइल ॲपचे लोकार्पण करून ताडोबाने तंत्रज्ञान आणि वनसंवर्धनाचा संगम घडवून आणला. इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कशिवाय फुलपाखरांच्या प्रजातींची अचूक ओळख करून देणारे हे देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाने विकसित केलेले पहिले ऑफलाइन एआय ॲप असल्याचे वनविभागाने सांगितले.

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

आंतरराष्ट्रीय व्याघ्घ्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वनविभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांच्यासह वनविभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  (फोटो सौजन्य – AI Created) 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इन-हाऊस विकासकांच्या चमूने विकसित केलेले हे ॲप निसर्गप्रेमी, विद्यार्थी, संशोधक, वन्यजीव अभ्यासक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मोबाइलमधील मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसतानाही फुलपाखराचे छायाचित्र स्कॅन करून काही क्षणांत त्याच्या प्रजातीची अचूक माहिती हे ॲप उपलब्ध करून देते. त्यामुळे दुर्गम वनक्षेत्रातही फुलपाखरांची ओळख पटविणे आता अधिक सोपे होणार आहे. या ॲपमध्ये १ हजार फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या पर्यटक आणि निसर्ग अभ्यासक वाघांसोचतच इतर वन्यजीव व फुलपाखरांविषयीही मोठी उत्सुकता दाखवत आहेत. मात्र, नेटवर्क नसलेल्या वनक्षेत्रात प्रजातीची ओळख पटविणे कठीण होते. आमच्या इन-हाऊस विकासकांनी तयार केलेले ‘लेपीस्कॅन’ हे ॲप ही अडचण दूर करून जैवविविधतेच्या संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यास मोलाची मदत करेल. – प्रभुनाथ शुक्ला, प्रकल्प संचालक, ताडोबा-अंधारी प्रकल्प.

Friendship Day 2026: फ्रेंडशिप डे होईल आणखी खास! Gemini AI च्या मदतीने बनवा मित्रांसोबतचे अनोखे फोटो, वापरा हे प्रॉम्प्ट्स

२५ नोंदी करणाऱ्यांना मोफत सफारी

नागरिक विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी वनविभागाने या ॲपशी प्रोत्साहनपर उपक्रमही जोडला आहे. २५ अतिरिक्त फुलपाखरांच्या नोंदी करणाऱ्या वापरकर्त्यांना एक मोफत जंगल सफारी देण्यात येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असून ताडोबाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सिटिझन सायन्स विभागातही बटरफ्लाय आयडी सुविधा सुरू करण्यात आली आहे. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा विचार करून या ॲपमध्ये वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. वापरकर्त्यांच्या भौगोलिक हालचालींचा कोणताही मागोवा घेतला जाणार नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Tadoba launches indias first offline ai butterfly id app lepiscan butterfly id

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
2

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
4

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.