BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 65 हजारांहून अधिक 4G टॉवर लाईव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम (बीएसएनएल) युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या युजर्सना फास्टेट इंटरनेट स्पीड मिळावा आणि भारताच्या खेड्यापाड्यांतील प्रत्येक कानाकोपऱ्यात मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. आता कंपनीने एक आनंदची बातमी देण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. बीएसएनएलने 1 लाख 4G टॉवर्स बसवण्याच्या आपल्या लक्ष्याकडे एक मोठे पाऊल उचलले आहे.
सर्व सरकारी Apps आता एकाच ठिकाणी होणार उपलब्ध, Apple आणि Google कडे मागितला मदतीचा हात!
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशभरात 65,000 हून अधिक 4G मोबाइल टॉवर लाईव्ह करून आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. ही बातमी म्हणजे या वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या 4G सेवांच्या कमर्शियल लाँचच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. 1 लाख 4G टॉवर्स बसवण्याच्या उद्दिष्टासह, बीएसएनएलची परंपरागत 3G पायाभूत सुविधा बंद करताना उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि चांगला वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती की, आता बीएसएनएलची 3G पायाभूत सुविधा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे जे युजर्स 3G सर्विसचा वापर करत आहेत, त्यांनी आपलं नेटवर्क 4G मध्ये अपग्रेड करणं गरजेचं आहे. 3G पायाभूत सुविधा बंद केल्यानंतर 65,000 हून अधिक 4G मोबाइल टॉवर लाईव्ह करून बीएसएनएलने यशाचा एख मोठा टप्पा गाठला आहे.
बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत X हँडलवर ही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आता 65 हजारांहून अधिक टॉवर लाईव्ह झाले आहेत. कंपनीने जारी केलेल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, यामुळे ग्राहकांना मजबूत सिग्नल, चांगला रिच आणि वेगवान गती मिळेल. 4G सोबत, बीएसएनएल नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम सेवा सुरू करण्यासाठी टाटा यांच्या सहकार्याने त्यांच्या 5G नेटवर्कची देखील सक्रियपणे चाचणी करत आहे.
With 65,000+ #BSNL4G towers now live, experience the power of stronger signals, wider reach, and faster speeds like never before.
Stay ahead, stay connected with #BSNL! #BSNLIndia #ConnectingBharat #PowerYourWorld pic.twitter.com/DdZSKXxYwg
— BSNL India (@BSNLCorporate) January 23, 2025
बीएसएनएलने 4G नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी त्यांचे 3G नेटवर्क बंद करण्यास सुरुवात केली आहे. बिहार आणि इतर अनेक टेलिकॉम सर्कलमध्ये 3G सेवा आधीच बंद करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप 4G वर अपग्रेड केले नाही ते त्यांच्या जवळच्या बीएसएनएल एक्सचेंज किंवा सेवा केंद्रांवर विनामूल्य सिम बदलू शकतात. एका अहवालानुसार, BSNL MD ने आणखी पुष्टी केली आहे की कमी किमतीत चांगली कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी मोबाइल दर वाढवण्याची कोणतीही त्वरित योजना नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची संधी
गेल्या वर्षी जुलै महिन्यात देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हिआयने टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ केली होती. युजर्सच्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या होत्या. कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. जिओ, एअरटेल आणि व्हिआयच्या ग्राहक संख्येत झपाट्याने वाढ झाली आणि बीएसएनएल युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्जमुळे हैराण झालेल्या ग्राहकांनी आपले सिमकार्ड बीएसएनएल मोबाईल नेटवर्कमध्ये स्वीच केलं.