Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘BSNL’ च्या या मॅसेजना युजर्सचा संताप, कंपनी ‘हे’ 3 स्वस्त प्लॅन बंद करण्याच्या तयारीत

सरकारी टेलिकॉम कंपनी पुढील महिन्यात आपले तीन बजेट रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा विचार करत आहे. BSNL वापरकर्त्याने एसएमएसचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये कंपनीने तीन बजेट रिचार्ज प्लॅन बंद केले जात असल्याची माहिती दिली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 29, 2025 | 08:55 AM
'BSNL' च्या या मॅसेजना युजर्सचा संताप, कंपनी 'हे' 3 स्वस्त प्लॅन बंद करण्याच्या तयारीत

'BSNL' च्या या मॅसेजना युजर्सचा संताप, कंपनी 'हे' 3 स्वस्त प्लॅन बंद करण्याच्या तयारीत

Follow Us
Close
Follow Us:

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BSNL कंपनीचे 3 स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करण्याच्या तयारीत आहे. यासंबंधित काही युजर्सना मॅसेज देखील पाठवण्यात आला आहे. BSNL कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्समध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. जेव्हा देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली, तेव्हा BSNL ने मोबाईल युजर्सना दिलासा देत स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले. मात्र आता कंपनीने हेच स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी

BSNL च्या युजर्सची संख्या घटली

सरकारी टेलिकॉम कंपनी पुढील महिन्यात आपले तीन बजेट रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा विचार करत आहे. या योजना “प्लॅन व्हाउचर” श्रेणी अंतर्गत येतात. BSNL त्यांच्या युजर्सना चांगल्या नेटवर्कचा अनुभव घेता यावा यासाठी प्रयत्न करत आहे. ठिकठिकाणी कंपनीचे टॉवर देखील लावले जात आहेत. अलीकडे, BSNL ने आपले नेटवर्क सुधारण्यासाठी 65,000 हून अधिक 4G मोबाइल टॉवर सक्रिय केले आहेत. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर बीएसएनएल वापरकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली होती. पण अलीकडे सादर केलेल्या अहवालानुसार, बीएसएनएल वापरकर्त्यांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळाली. अशातच आता कंपनीने त्यांचे रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वापरकर्त्यांना आला एसएमएस अलर्ट

BSNL वापरकर्त्याने सोशल मीडियावर एसएमएसचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये कंपनीने तीन बजेट रिचार्ज प्लॅन बंद केले जात असल्याची माहिती दिली. मॅसेजमध्ये लिहिले होते, ‘प्रिय ग्राहक, प्लॅन व्हाउचर 201, 797 आणि 2999 हे 10.02.2025 पासून बंद केले जात आहेत. इतर व्हाउचरच्या माहितीसाठी कृपया सेल्फकेअर ॲप डाउनलोड करा आणि रिचार्जवर 2% सूट मिळवा. धन्यवाद.’ युजरने सांगितले की त्याला हा मेसेज त्याच्या बीएसएनएल नंबरवर आला होता. हे तीन प्लॅन 365 दिवसांपर्यंत वैधता आणि अनेक फायदे देतात. BSNL ने घोषणा केली आहे की हे प्लॅन 10 फेब्रुवारी 2025 पासून बंद केले जातील. त्यामुळे युजरने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

You should be ashamed that to benefit private telecom companies, BSNL’s 201, 797, 2999 plans are being discontinued. How much more will you recover from the poor? pic.twitter.com/UVKt9BQadS — Ayush Srivastava(Chitransh) (@AyushAsji21861) January 27, 2025

हे तीन प्लॅन काय आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत?

201 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • वैधता: 90 दिवस
  • कॉलिंग फायदे: नाही
  • इतर वैशिष्ट्ये: केवळ बेसिक सर्विसेज

797 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • वैधता: 300 दिवस
  • पहिल्या 60 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग
  • प्रति दिन 2GB हाय-स्पीड डेटा (पहिले 60 दिवस)
  • दररोज मोफत 100 SMS

2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • वैधता: 365 दिवस
  • वर्षभर अमर्यादित कॉलिंग
  • मोफत नॅशनल रोमिंग (पॅन इंडिया)
  • 3जीबी हाय-स्पीड डेटा प्रतिदिन
  • 100 एसएमएस प्रतिदिन
  • इतर फ्री वॅल्यू-एडेड सर्विसेज
5000mAh बॅटरी आणि पंच होल डिस्प्लेसह Infinix चा नवीन स्मार्टफोन लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

बीएसएनएल वापरकर्त्यांनी काय करावे?

तुम्ही या तीनपैकी कोणताही प्लॅन वापरत असाल तर 10 फेब्रुवारी 2025 पूर्वी तुमच्या प्लॅनची ​​वैधता तपासा. BSNL च्या इतर उपलब्ध योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही BSNL Selfcare ॲप डाउनलोड करू शकता आणि रिचार्जवर 2% सूट देखील मिळवू शकता.

Web Title: Tech news bsnl is planning to close three cheapest recharge plan user got message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
1

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन
2

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क
3

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
4

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.