DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील युजर्सची संख्या किती?
DeepSeek च्या AI चॅटबॉटने सर्वांचीच झोप उडवली आहे. DeepSeek अनेक जुन्या AI चॅटबॉट्सना मागे टाकत आहे. अलीकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, 140 देशांमध्ये सर्वाधिक डाउनलोड केलेल्या ॲप्सच्या यादीत DeepSeek टॉप स्थानावर आहे. DeepSeek युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या AI चॅटबॉटचे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत.
लॉचिंगआधीच Samsung च्या ‘या’ जबरदस्त स्मार्टस्फोनची माहिती लीक; विक्रीवर काय परिणाम होणार?
DeepSeek ने स्वस्त दरात एआय मॉडेल्स तयार करून जगाला आश्चर्यचकित केले आहे. कंपनीच्या नवीनतम मॉडेलने अनेक प्रकरणांमध्ये अमेरिकन कंपन्यांच्या AI मॉडेलपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मात्र या AI चॅटबॉटवर आता अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. यूएस नेव्ही, इटली आणि आयर्लंडमध्ये DeepSeek वर बंदी घालण्यात आली आहे. DeepSeek वर बंदी घालणारे इटली आणि आयर्लंड पहिले देश ठरले आहेत. त्यामुळे आता या देशात DeepSeek डाऊनलोडसाठी उपलब्ध नसेल. (फोटो सौजन्य – X)
DeepSeek चा AI चॅटबॉट Apple च्या App Store वर सर्वात जास्त डाउनलोड केलेल्या मोफत ॲप्सच्या शीर्षस्थानी पोहोचला आहे. 26 जानेवारीपासून हे ॲप टॉपवर आहे. या ॲपच्या युजर्स संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक नवीन युजर्स DeepSeek डाऊनलोड करत आहेत. DeepSeek चे केवळ एकट्या भारतात 15.6 युजर्स आहेत. यावरून असा अंदाज लावता येतो की भारतातही मोठ्या प्रमाणात लोक DeepSeek डाउनलोड करत आहेत. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर ते 26 जानेवारीपासून Google Play Store वर पहिल्या स्थानावर आहे. हा चॅटबॉट पहिल्या 18 दिवसांत 16 दशलक्ष वेळा डाउनलोड झाला. जर आपण याची OpenAI च्या ChatGPT शी तुलना केली तर पहिल्या 18 दिवसात याला 90 लाख डाउनलोड मिळाले होते. त्यामुळे चीनचे DeepSeek हे OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देत आहे.
आतापर्यंत, DeepSeek चा AI चॅटबॉट वेगाने नवीन वापरकर्ते जोडत आहे, परंतु येणारा काळ त्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. खरं तर, अनेक सरकार आणि कंपन्यांनी सायबर सुरक्षेला धोका मानून त्यावर बंदी घातली आहे. दुसरीकडे, DeepSeek वरही माहिती सेन्सॉर केल्याचा आरोप होत आहे. ते चीनच्या टीकेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना प्रतिसाद देण्यात अयशस्वी ठरते, ज्यामुळे वापरकर्त्यांचा भ्रमनिरास होत आहे.
डीपसीक आज एक लोकप्रिय व्यासपीठ आहे. कमी किमतीमुळे या प्लॅटफॉर्मने जगभरात खळबळ उडवली आहे. चायनीज स्टार्टअप DeepSeek वर ऑनलाइन जगामध्ये काही डेटा सार्वजनिकरित्या लिक केल्याचा आरोप आहे. या डेटाबेसमध्ये अनेक संवेदनशील तपशील आहेत, ज्यात चॅट इतिहास, सिकरेट की आणि बरेच तपशील समाविष्ट आहेत. एकूण 1 लाखांहून अधिक डेटा लीक झाला आहे. मात्र, या लीक झालेल्या डेटामध्ये कोणत्या देशाच्या युजर्सचे डिटेल्स आहेत याची कोणतीही माहिती नाही.