लॉचिंगआधीच Samsung च्या 'या' जबरदस्त स्मार्टस्फोनची माहिती लीक; विक्रीवर काय परिणाम होणार?
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपल्या पहिल्या ट्राय-फोल्ड फोनची घोषणा केली आहे. लवकरच हा नवीन फोन लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सॅमसंग आपल्या पहिल्या ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल किंवा ट्राय-फोल्ड फोनवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. आता सॅमसंगच्या या आगामी फोनबद्दल काही माहिती समोर आली आहे. यामध्ये सॅमसंगच्या या आगामी फोनचं नाव आणि काही फीचर्स समोर आले आहेत.
OpenAI ने रिलीज केला नवीन एआय मॉडेल, युजर्सना मिळणार फ्री सर्विस! DeepSeek ला देणार टक्कर
सॅमसंगच्या पहिल्या ट्राय-फोल्ड फोनचे अंदाजे नाव आणि काही फीचर्सची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल सेगमेंटमध्ये चीनी कंपनी Huawei चे एकच मॉडेल आहे. अनेक कंपन्या त्यांचे ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सॅमसंगचा आगामी ट्राय फोल्ड स्मार्टफोन Huawei ला टक्कर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग आपल्या ट्राय-फोल्ड फोनला Galaxy G Fold असे नाव देऊ शकते. “G” ब्रँडिंगमागील कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु असे म्हटले जात आहे की ते फोनच्या फोल्डिंग मॅकेनिज्म प्रतिबिंबित करू शकते. सॅमसंग या फोनमध्ये इनवर्ड फोल्डिंग स्क्रीन देऊ शकते. हा फोन बंद केल्यावर त्याची स्क्रीन आतच राहील आणि तुमच्या हातातून पडल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी असते. तर Huawei च्या Mate XT ची स्क्रीन बाहेरच्या बाजूला फोल्ड होते. हे बंद केल्यावर, समोर एक डिस्प्ले राहतो, ज्यामुळे नुकसान होण्याचा धोका वाढतो. मात्र सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनचं डिझाईन वेगळं असणार आहे.
असा अंदाज लावला जात आहे की पूर्णपणे उघडल्यानंतर गॅलेक्सी जी फोल्डची स्क्रीन 9.96 इंच असू शकते. हे Z Fold 6 च्या 7.6-इंच स्क्रीनपेक्षा 30 टक्के मोठे आहे. फोल्ड केल्यावर त्याची स्क्रीनची उंची सामान्य स्मार्टफोनप्रमाणे 6.5 इंच असू शकते. Galaxy G Fold चे वजन जवळपास Mate XT सारखेच म्हणजेच 298 ग्रॅम असण्याची शक्यता आहे. सॅमसंग Z-सिरीजपेक्षा वेगळ्या आणि नवीन डिस्प्ले आणि संरक्षणात्मक फिल्म जी फोल्डमध्ये वापरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Google Photos दिसणार नव्या अंदाजात! डेस्कटॉप वर्जनमध्ये आलं नवीन अपडेट, Image Flip सह करा फोटो एडीट
सॅमसंगकडून फोनच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत हा लाँच केला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. कंपनी मर्यादित प्रमाणातच उत्पादन करण्याचा विचार करत आहे.
सॅमसंगचा हा पहिला ट्राय फोल्ड फोन आहे. आतापर्यंत कंपनीने फ्लीप आणि फोल्ड असे अनेक मॉडेल्स लाँच केले आहेत. सध्या समोर आलेल्या फीचर्सनुसार सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन धुमाकूळ घालणार आहे. त्यामधील अनेक फीचर्स आणि डिझाईन Huawei च्या Mate XT पेक्षा उत्तम असण्याची शक्यता आहे.