Mahakumbh 2025: महाकुंभात प्रियजनांपासून वेगळं होण्याची भिती कायमची संपणार, Google Maps चं हे फीचर मदतीला धावणार
महाकुंभ 2025 ची सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांतच महाकुंभाची सांगता होणार आहे. करोडो भाविकांनी महाकुंभाला उपस्थिती लावली आहे. काही भाविक आपल्या कुटुंबीयांसह आणि लहान मुलांसह महाकुंभाला आले आहेत, तर काही भाविक एकटेच येथे आपली उपस्थिती नोंदवत आहेत. प्रयागराजमध्ये हा 45 दिवसांचा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. महाकुंभात करोडो भाविक आले आहेत, त्यामुळे येथे प्रचंड गर्दी आहे. या कारणास्तव, सर्वांचीच सर्वात मोठी चिंता ही आहे की या प्रचंड गर्दीत त्यांचे प्रियजन त्यांच्यापासून वेगळे होऊ शकतात.
पेगाससनंतर आता Paragon चा धोका, हे लोकं हॅकर्सच्या निशाण्यावर? WhatsApp ने इशारा दिला
आता सर्वांची ही चिंता कायमची संपणार आहे. कारण या चिंतेला बाय-बाय म्हणण्यात गुगल मॅप्स तुमची मदत करू शकतात. वास्तविक, गुगल मॅप्स बहुतेक स्मार्टफोन्समध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहेत. या ॲपच्या मदतीने रिअल-टाइम लोकेशन ओळखता येते. यामुळे तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे लोकेशन शेअर केले तर कोण कुठे आहे हे समजण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. गुगल मॅप्सवर डीफॉल्टनुसार उपलब्ध असलेले रिअल-टाइम लोकेशन शेअरिंग वैशिष्ट्य सक्षम करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही लोकांची निवड करताच, तुमचे रिअल टाइम लोकेशन लिंकद्वारे शेअर केले जाईल. प्रत्येकाच्या स्मार्टफोनसह ही प्रक्रिया पुन्हा करा. त्यानंतर तुम्ही सर्व ॲप्समध्ये एकमेकांचे लाईव्ह लोकेशन पाहू शकाल. या फीचरच्या मदतीने नेमके ठिकाण पाहण्यास मदत होऊ शकते. तुम्ही या सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन शेअरिंग देखील बंद करू शकता.
रविवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 41.90 लाखांहून अधिक भाविकांनी प्रयागराज महाकुंभात पवित्र स्नान केले. तर 1 फेब्रुवारीपर्यंत 33.61 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले असल्याची माहिती उत्तर प्रदेश माहिती विभागाने दिली आहे. मौनी अमावस्येप्रमाणेच बसंत पंचमीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तर प्रदेशचे सरकार प्रयत्न करत आहे. बसंत पंचमी स्नानासाठी संगमावर आल्यानंतर घाटाच्या काठावर थांबणाऱ्या भाविकांना बाजूला करण्यात येत आहे.
WhatsApp चं युजर्सना खास गिफ्ट! लॅपटॉपवर मिळणार हे अप्रतिम फीचर, चॅटिंगची मजा आणखी वाढणार
मौनी अमावस्येच्या वेळी लोक मोठ्या संख्येने होल्डिंग एरियामध्ये राहिले आणि झोपले होते, हे चेंगराचेंगरीचे एक प्रमुख कारण बनले. त्यामुळे येथील परिस्थितीचा आधीच प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. बसंत पंचमीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाकुंभमेळा परिसरात चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.