Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DeepSeek चा वापर केल्यास होणार 20 वर्षांचा तुरुंगवास! या देशाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

ऑस्ट्रेलिया आणि इटलीनंतर अमेरिकाही डीपसीकवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. जर कोणी ते वापरताना आढळले तर त्याला मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. डीपसीक ही एक चिनी स्टार्टअप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2025 | 08:57 AM
DeepSeek चा वापर केल्यास होणार 20 वर्षांचा तुरुंगवास! या देशाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

DeepSeek चा वापर केल्यास होणार 20 वर्षांचा तुरुंगवास! या देशाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

यूएस नेव्ही, इटली, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी आतापर्यंत चीनचा AI चॅटबोट असलेल्या DeepSeek वर बंदी घातली आहे. यानंतर आणखी एका देशाने DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता DeepSeek ला अनेक अडचणींचा सामना करावा लागाणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच DeepSeek ने चॅटजीपीटीपेक्षा अव्वल स्थान गाठलं होतं. मात्र आता अनेक देशांमधील बंदीमुळे DeepSeek ला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

DeepSeek चं काळ सत्य उघड! चीन सरकारला पाठवला जातोय सर्व डेटा, नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वीच चीनचा AI चॅटबोट असलेल्या DeepSeek ने अमेरिकेत चॅटजीपीटीला मागे टाकलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेतच DeepSeek वर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. अहवालानुसार, काही अमेरिकन कायदेकर्त्यांनी सरकारी उपकरणांमध्ये चिनी एआय चॅटबॉट्सच्या वापरावर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मांडले आहे.अनेक अमेरिकन सिनेटर सरकारी उपकरणांवर या चिनी एआय चॅटबॉटवर बंदी घालणारा कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जर कोणी DeepSeek वापरताना आढळले तर त्याला दंड होऊ शकतो आणि तुरुंगातही जावे लागू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

विधेयकात काय म्हटलं आहे?

अहवालानुसार, अमेरिकेत DeepSeek एआयवर बंदी घालण्याची योजना आहे. जर हा कायदा लागू झाला तर DeepSeek वापरणाऱ्यांना तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, जर हे विधेयक मंजूर झाले आणि कोणीही DeepSeek वापरताना आढळले तर त्यांना 10 लाख डॉलर्स (सुमारे 6.5 कोटी रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो. एवढेच नाही तर या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. विधेयकानुसार, डीपसीकच्या वापरावर केवळ सरकारी उपकरणांवरच नव्हे तर खाजगी कंपन्यांमध्येही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. जर कोणत्याही कंपनीने या एआयचा वापर केला तर तिला 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 8 अब्ज रुपये) पर्यंत दंड भरावा लागू शकतो.

अमेरिकेच्या या निर्णयाचं कारण काय?

चीनी अ‍ॅप अमेरिकन नागरिकांचा डेटा चीनी सरकारला देतात, असा आरोप केला जात आहे. याच आरोपमुळे अमेरिकेन यापूर्वी चीनी अ‍ॅप टीकटॉकवर बंदी घातली आहे आणि पुन्हा एकदा त्याच कारणामुळे चीनचा AI चॅटबोट DeepSeek वर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. अमेरिकन सरकारचा असा विश्वास आहे की DeepSeek एआय अमेरिकन नागरिकांचा डेटा चीनी सरकारला देऊ शकते.

हे विधेयक अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर जोश हॉली यांनी मांडले आहे. त्यांनी DeepSeek एआयच्या सुरक्षा, गोपनीयता आणि नीतिमत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता लवकरच टीकटॉकप्रमाणे DeepSeek देखील अमेरिकेत बॅन केला जाण्याची शक्यता आहे.

इटलीनंतर ‘या’ देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर

ऑस्ट्रेलियाने अलिकडेच सर्व सरकारी प्रणाली आणि उपकरणांमधून DeepSeek एआय काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय यूएस नेव्हीने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना DeepSeek चा वापर करण्यास मनाई केली आहे. एवढेच नव्हे तर इटली आणि आयर्लंडने देखील DeepSeek वर बंदी घातली आहे. त्यामुळे अमेरिकेपूर्वी अनेक देशांनी DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भारत सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना DeepSeek आणि चॅटजीपीटीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.

Web Title: Tech news us is planning to ban deepseek for government devices know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.