DeepSeek चं काळ सत्य उघड! चीन सरकारला पाठवला जातोय सर्व डेटा, नेमकं प्रकरण काय?
चिनी स्टार्टअप असलेल्या DeepSeek च्या AI टूलबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुम्ही देखील DeepSeek AI चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची कारण आहे. कारण तुमचा डेटा धोक्यात आहे. सध्या अशी माहिती समोर आली आहे की, DeepSeek AI त्यांच्या युजर्सचा सर्व डेटा चिनी सरकारला पाठवत आहे. त्यामुळे आता DeepSeek AI युजर्सच्या गोपनीयता आणि डेटा स्टोरेजबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
इटलीनंतर ‘या’ देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर
गेल्या अनेक दिवसांपासून DeepSeek AI बाबत दावे – प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आणि आता अशातच अशी माहिती समोर आली आहे की, DeepSeek AI च्या प्रोग्रामिंगमध्ये एक कोड लपलेला आहे जो वापरकर्त्यांचा डेटा थेट चीन सरकारला पाठवत आहे. यानंतर, डीपसीकवरील वापरकर्त्यांच्या गोपनीयता आणि डेटा स्टोरेजबाबत अधिक गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. युजर्सच्या डेटाचा गैरवापर केला जाणार आहे की आणखी काही अशी शंका आता अनेकांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनमध्ये DeepSeek AI चा वापर करत असाल तर तुम्हाला देखील काळजी घेणं गरजेचं आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
कॅनेडियन सायबर सुरक्षा कंपनी फेरूट सिक्युरिटीचे सीईओ इव्हान त्सारिनी म्हणाले की, DeepSeek मध्ये एक कोड आहे जो वापरकर्त्यांचा डेटा चीन सरकारला पाठवतो. DeepSeek मध्ये असलेल्या कोडचा थेट संबंध चीन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या चीनमधील सर्व्हर आणि कंपन्यांशी दिसून आला आहे. हे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. याचा अर्थ असा की DeepSeek वर अकाउंट तयार करणारे लोक नकळत चीनमध्ये अकाउंट नोंदणी करत आहेत. यामुळे चिनी प्रणालींना वापरकर्त्यांची ओळख, शोध प्रश्न आणि ऑनलाइन वर्तन निरीक्षण करणे सोपे होत आहे.
हा कोड डीपसीकच्या वेब लॉगिन पेजवर आढळला, जो वापरकर्त्यांचे खाते तयार करणे आणि लॉग इन करणे या प्रक्रियेचा एक भाग असल्याचे दिसून येते. कॅनेडियन सायबर सुरक्षा कंपनी फेरूट सिक्युरिटीने प्रथम याचा शोध लावला. या शोधानंतर, अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे, कारण एआय सिस्टीममध्ये संवेदनशील डेटाचा वापर वेगाने वाढत आहे.हे प्रकरण टिकटॉकपेक्षाही मोठे असू शकते, कारण एआय चॅटबॉट्समध्ये शेअर केलेली माहिती अनेकदा अधिक गोपनीय असते.
त्सारिनी म्हणाले की, असे प्रोग्रामिंग डीपसीकच्या कोडमध्ये केले गेले आहे, जे वापरकर्त्यांचा डेटा चीनी कंपनी चायना मोबाइलच्या ऑनलाइन रजिस्ट्रीकडे पाठवते. चायना मोबाईल ही चीन सरकारच्या नियंत्रणाखालील दूरसंचार कंपनी आहे. अमेरिकेने 2019 मध्ये या कंपनीवर गंभीर आरोप करत बंदी घातली होती. अमेरिकेने म्हटले होते की ही कंपनी वापरकर्त्यांच्या डेटावर अनधिकृत प्रवेश घेते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आता त्याच कंपनीकडे युजर्सचा डेटा पाठवला जात आहे.
‘कर्मचाऱ्यांनी ChatGPT आणि DeepSeek वापरू नये…’, केंद्र सरकारने दिला इशारा! काय आहे कारण?
अनेक तज्ञांनी DeepSeek ला टिकटॉकपेक्षा जास्त धोकादायक म्हटले आहे. चीन सरकारसोबत वापरकर्त्यांचा डेटा शेअर केल्याच्या आरोपांमुळे भारत सरकारने टिकटॉकवर बंदी घातली आहे आणि अमेरिकेतही त्यावर बंदी घालण्यात आली आहे.