इटलीनंतर 'या' देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर
चिनचा AI चॅटबोट DeepSeek वर यूएस नेव्ही, इटली आणि आयर्लंडने बंदी घातली आहे. यानंतर आता आणखी एक देश आहे, ज्याने DeepSeek AI वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने चिनचा AI चॅटबोट DeepSeek वर बंदी घातली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियातील सर्व सरकारी सिस्टम आणि डिव्हाईसवर चिनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्टार्टअप DeepSeek च्या सेवांचा वापर केला जाणार नाही. याबाबत एक आदेश देखील जारी करण्यात आला आहे.
DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील युजर्सची संख्या किती?
ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क म्हणाले की, गुप्तचर संस्थांनी या तंत्रज्ञानाचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून आता ऑस्ट्रेलियातील कोणत्याही सरकारी सिस्टम आणि डिव्हाईसवर DeepSeek चा वापर केला जाणार नाही. हा निर्णय केवळ सरकारी सिस्टम आणि डिव्हाईससाठी लागू करण्यात आला आहे, याचा सामान्य लोकांच्या जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सामान्य लोकं त्यांच्या स्मार्टफोन्स किंवा लॅपटॉपवर DeepSeek चा वापर करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
DeepSeek चा AI चॅटबॉट कमी कालावधीत लोकप्रिय झाला, परंतु त्याच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण केले जात आहेत. OpenAI च्या AI चॅटबॉट ChatGPT ला मागे टाकत DeepSeek ने एक नवा टप्पा गाठला होता. कमी काळातच DeepSeek च्या युजर्स संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यादरम्यान DeepSeek वर अनेक आरोप देखील करण्यात आले होते, ज्यामध्ये DeepSeek युजर्सचा डेटा चीनमध्ये ट्रांसफर करत आहे असं सांगितलं जात होतं. यानंतर यूएस नेव्ही, इटली आणि आयर्लंड यांनी DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने देखील DeepSeek वर बंदी घातली आहे. सरकारने DeepSeek सर्व सरकारी यंत्रणेतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
ही बंदी फक्त सरकारी उपकरणांना लागू असेल, सामान्य नागरिकांच्या फोनवर नाही. तथापि, सरकारने लोकांना डीपसीकच्या सुरक्षा धोरणांना समजून घेण्याचा आणि त्यांचा डेटा सुरक्षित ठेवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री मरे वॅट म्हणाले की, जर सरकार DeepSeek सुरक्षित मानत नसेल तर लोकांनीही त्याबद्दल विचार करावा. अनेक खाजगी कंपन्यांनीही DeepSeek या एआय सेवेचा वापर थांबवला आहे. त्यामुळे युजर्सनी त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन DeepSeek वापरण्याबाबत विचार करावा.
यूएस नेव्हीनंतर आता या देशांमध्येही DeepSeek AI वर बंदी; भारत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम
सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाने यापूर्वी चिनी कंपन्यांवर कारवाई केली आहे. 2018 मध्ये, त्यांनी हुआवेईला त्यांच्या 5 जी नेटवर्कवरून बंदी घातली, ज्यामुळे चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये राजनैतिक वाद निर्माण झाला. आता डीपसीकवर बंदी घालून सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. इटली आणि आयर्लंड देखील डीपसीकच्या डेटा सुरक्षेची चौकशी करत आहेत, तर शेकडो खाजगी कंपन्यांनी ते आधीच ब्लॉक केले आहे.